शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मान्सून शॉर्टफिल्म कार्निव्हल रविवारी, शॉर्टफिल्म क्लबचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 17:34 IST

कोल्हापुरातील लघुपटनिर्मात्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यापर्यंत देश-परदेशांतील लघुपटांची माहिती मिळावी, त्यांवर चर्चा व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शॉर्टफिल्म क्लबच्या वतीने रविवारी (दि. २९) ‘मान्सून शॉर्टफिल्म कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती किरणसिंह चव्हाण व अजय कुरणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे मान्सून शॉर्टफिल्म कार्निव्हल रविवारी शॉर्टफिल्म क्लबचे आयोजन

कोल्हापूर : कोल्हापुरातील लघुपटनिर्मात्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यापर्यंत देश-परदेशांतील लघुपटांची माहिती मिळावी, त्यांवर चर्चा व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शॉर्टफिल्म क्लबच्या वतीने रविवारी (दि. २९) ‘मान्सून शॉर्टफिल्म कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती किरणसिंह चव्हाण व अजय कुरणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.शाहू स्मारक भवनात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हा कार्निव्हल होईल. यात कोल्हापुरातील नावाजलेल्या शॉर्टफिल्म्स तसेच ‘चाफा’ व ‘दिसाड दिस’ हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कृत लघुपट दाखविण्यात येणार आहेत. ‘चाफा’ने किफ, प्रभात बेस्ट फिल्म अवॉर्ड मिळविले आहेत. या सिनेमाची दिग्दर्शिका मानसी देवधरने ‘कान्स’ फिल्म फेस्टिव्हलचा ‘चाफा’सोबत अनुभव घेतला आहे.

यानिमित्ताने रसिकांना तिच्याशी संवाद साधता येणार आहे. ‘दिसाड दिस’ या फिल्मने बोस्निया येथील विवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोल्डन बटरफ्लाय अवॉर्ड’ मिळविले आहे. त्याचबरोबर दहाव्या सिलाफेस्ट, सर्बियामधे ही फिल्म निवडली गेली आहे.

अनेक पुरस्कारांसह वॉशिंग्टन, इटली, बांगलादेश, येथील फेस्टिव्हल्समध्ये ‘दिसाड दिस’ची अधिकृतरीत्या निवड झालेली आहे. या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शक नागनाथ खरात उपस्थित राहणार असून, ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. कार्निव्हलमध्ये जवळपास दहा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.तरी रसिकांनी या लघुपट कार्निव्हलचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस सागर बकरे, सुरेश पाटील, संदीप गावडे, अमर कांबळे, समीर पंडितराव, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :entertainmentकरमणूकkolhapurकोल्हापूर