प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सव : ‘पारो’, ‘अनाहूत’ लघुपटांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:03 PM2018-02-20T15:03:10+5:302018-02-20T15:06:13+5:30

अहमदनगर येथील ११ व्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवामध्ये राष्ट्रीय लघुपट व माहितीपट स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटात रोहतक (हरियाणा) येथील विजय कुमार यांच्या ‘पारो’ या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला.

Reflection National Film Festival: 'Paro', 'Anahoot', short films | प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सव : ‘पारो’, ‘अनाहूत’ लघुपटांची बाजी

प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सव : ‘पारो’, ‘अनाहूत’ लघुपटांची बाजी

Next

अहमदनगर : अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभाग आयोजित ११ व्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवामध्ये राष्ट्रीय लघुपट व माहितीपट स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटात रोहतक (हरियाणा) येथील विजय कुमार यांच्या ‘पारो’ या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. खुल्या गटामध्ये कोल्हापूर येथील उमेश बगाडे यांच्या अनाहूत या लघुपटाने बाजी मारली. माहितीपट स्पर्धेमध्ये मुंबई येथील वैशाली केंदळे यांच्या ‘चेसिंग ड्रिम्स’ या माहितीपटाला प्रथम क्रमांक मिळाला.
प्रसिद्ध सिने छायाचित्रकार धरम गुलाटी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे उपस्थित होते. महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात चार दिवस चाललेल्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार झावरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी समाधान व्यक्त केले. सिनेमा हा सर्व कलांचा समुच्चय असून, हा महोत्सव ग्रामीण भागातील कलावंतांचे नेतृत्व करतो, असे मत धरम गुलाटी यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक संज्ञापन अभ्यास विभागप्रमुख प्रा. बापू चंदनशिवे यांनी केले. यावेळी संस्थेच्या सचिव अ‍ॅड. दीपलक्ष्मी म्हसे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे व प्रा. गिरीश कुकरेजा यांनी मनोगत व्यक्त केले.
उपप्राचार्य प्रा. आर. जी. कोल्हे, तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन करण गाभणे याने केले, तर आभार चित्रपट महोत्सवाचे संचालक प्रा. राहुल चौधरी यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल

लघुपट स्पर्धा- विद्यार्थी गट : प्रथम क्रमांक- पारो (दिग्दर्शक- विजय कुमार) रोहतक
द्वितीय- निशब्द (दिग्दर्शक- मिलिंद विसपुते)- पुणे
तृतीय- ब्युटी (दिग्दर्शक- प्रवीण खाडे)- अहमदनगर
उत्कृष्ट दिग्दर्शक- विजय कुमार (पारो)
उत्कृष्ट छायाचित्रकार- शशांक विराग (पारो)
उत्कृष्ट संकलक- शुभम सेवाइवार (मरियम)

लघुपट स्पर्धा- खुला गट :

प्रथम- अनाहूत (दिग्दर्शक- उमेश बगाडे)- कोल्हापूर
द्वितीय- मयत (दिग्दर्शक- सुयश शिंदे)- पुणे
तृतीय- पोस्ट मॉर्टेम (दिग्दर्शक- विनोद कांबळे)- मुंबई
उत्कृष्ट दिग्दर्शक- उमेश बगाडे (अनाहूत)
उत्कृष्ट छायाचित्रकार- सुरजोदीप घोष (पाओ ना पाओ)
उत्कृष्ट संकलक- सौरभ देसाई (अनाहूत)

माहितीपट स्पर्धा

प्रथम- चेसिंग ड्रिम्स (दिग्दर्शक- वैशाली केंदळे)- मुंबई
उत्तेजनार्थ- मेरा शडवाल (दिग्दर्शक- मोहन धुलधर)- पुणे

 

Web Title: Reflection National Film Festival: 'Paro', 'Anahoot', short films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.