शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस न्यायालय उठेपर्यंत शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 13:35 IST

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी श्याम अप्पासो सोनवणे (वय ३८) याला गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन एल. डी. बिले यांनी न्यायालय उठेपर्यंत शिक्षा सुनावली. सरकारी वकील अ‍ॅड. अमृता पाटोळे यांनी काम पाहिले.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीचा विनयभंगआरोपीस न्यायालय उठेपर्यंत शिक्षा

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी श्याम अप्पासो सोनवणे (वय ३८) याला गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन एल. डी. बिले यांनी न्यायालय उठेपर्यंत शिक्षा सुनावली. सरकारी वकील अ‍ॅड. अमृता पाटोळे यांनी काम पाहिले.या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, पीडित मुलगी अल्पवयीन होती. ती शाळेला व क्लासला जाताना श्याम सोनवणे तिचा पाठलाग करीत असे. तसेच तिच्या अंगाला स्पर्श करून धक्का मारून जात असे. अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत असे.

त्याचबरोबर सोनवणे हा, पीडित मुलीच्या घरात कोणीही नाही याचा अंदाज घेऊन, घराबाहेर थांबून हावभाव व छेडछाड करीत होता. तिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी सोनवणेला समजावून सांगितले; पण या मुलीला त्रास देण्याचे त्याने सुरूच ठेवले. त्यामुळे या मुलीला शिक्षण घेणे अडचणीचे झाले.

संबंधित मुलीने श्याम सोनवणे याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम. टी. गभाले यांनी केला. हा प्रकार १८ आॅक्टोबर २०१५ रोजी व त्यापूर्वी दोन महिन्यांपासून रविवार पेठ परिसरात घडला.सरकार पक्षाने या प्रकरणात एकूण पाच साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील अ‍ॅड. अमृता पाटोळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून बिले यांनी श्याम सोनवणेला न्यायालय उठेपर्यंत शिक्षा तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार दिवस साधी कैद तसेच तीन वर्षांचा चांगल्या वर्तणुकीचा बॉँड अशा प्रकारची शिक्षा सुनावली.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पैरवी अधिकारी साताप्पा कळंत्रे, सहायक फौजदार दत्तात्रय मासाळ व हेड-कॉन्स्टेबल तुकाराम पाटील यांनी मदत केली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा