शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : म.न.पा.स्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र, उषाराजे हायस्कूलची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 14:20 IST

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील म. न. पा.स्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा, तर मुलींमध्ये छत्रपती शाहू विद्यालयाचा उषाराजे हायस्कूलने पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.

ठळक मुद्देम.न.पा.स्तर शालेय फुटबॉल स्पर्धामहाराष्ट्र, उषाराजे हायस्कूलची बाजी

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील म. न. पा.स्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा, तर मुलींमध्ये छत्रपती शाहू विद्यालयाचा उषाराजे हायस्कूलने पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यांत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा ३-० असा पराभव केला. महाराष्ट्रकडून दर्शन पाटीलने दोन, शाहीद महालकरीने एक गोलची नोंद केली. तत्पूर्वी महाराष्ट्र हायस्कूलने स. म. लोहिया हायस्कूलचा ४-० असा, तर शाहू विद्यालयाने माईसाहेब बावडेकर स्कूलचा सडनडेथवर पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या १४ वर्षांखालील मुलींच्या म. न. पा. स्तर फुटबॉल स्पर्धेत विजयी झालेल्या उषाराजे हायस्कूलच्या संघासोबत मान्यवर उपस्थित होते.

१४ वर्षांखालील मुलींमध्ये उषाराजे हायस्कूलने शाहू विद्यालयाचा ४-३ असा टायब्रेकरवर पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत उषाराजे हायस्कूलने भाई माधवराव बागल हायस्कूल, तर शाहू विद्यालयाने पोदार इंटरनॅशनल स्कूलचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.विजेत्या संघाला उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी राजेंद्र दळवी, नितीन जाधव, राजू साळोखे, सुरेश पिसाळ, प्रदीप साळोखे, सचिन पांडव आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :FootballफुटबॉलSchoolशाळाkolhapurकोल्हापूर