शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

कोल्हापूर : आजऱ्यात मृत्युंजयकारांचे स्मृती दालन : शौमिका महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:11 IST

मराठीतील ख्यातनाम साहित्यिक दिवंगत मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांचे आजरा येथे स्मृतीदालन उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून ५0 लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआजऱ्यात मृत्युंजयकारांचे स्मृती दालन : शौमिका महाडिकपालकमंत्र्यांकडून ५0 लाखांचा निधी

कोल्हापूर : मराठीतील ख्यातनाम साहित्यिक दिवंगत मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांचे आजरा येथे स्मृतीदालन उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून ५0 लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.शिवाजीराव सावंत हे जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलमध्ये १९६० ते १९६३ या कालावधीत टायपिंगचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. या अभिमानातूनच सावंत यांचे स्मृतीदालन त्यांच्या जन्मगावी उभारण्याचा निर्णय घेतल्याचे महाडिक यांनी सांगितले. यावेळी आजऱ्यांच्या सभापती रचना होलम, नगराध्यक्ष ज्योत्सना चराटी, शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आजऱ्यांच्या नगरसेविका शुभदा जोशी उपस्थित होत्या.या प्रकल्पाबाबत बोलताना महाडिक म्हणाल्या, ‘मृत्यंजय’ कादंबरी वाचल्यानंतर मी भारावून गेले होते. अध्यक्षा झाल्यानंतर चर्चा करत असताना शिवाजीराव सावंत हे जिल्हा परिषदेच्या सेवेत होते अशी माहिती मला मिळाली. यानंतर त्यांचे जन्मगाव आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मी घेतली.

१९९० साली सावंत यांच्या ‘मृत्यंजय’ कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचे कोलकत्याहून साहित्याच्या नोबेलसाठी नामांकन झाले होते. १९९५ साली त्यांना भारतीय ज्ञानपीठाचा अत्यंत प्रतिष्ठेचा मूर्तीदेवी पुरस्कार मिळाला होता.

आचार्य अत्रे यांच्यापासून अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत समाजातील सर्व थरातील मान्यवरांसह सर्वसामान्य वाचकांमध्ये लोकप्रिय असलेल्या या साहित्यीकाच्या स्मृती जपण्यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनकाय करु शकतो असा विचार केल्यानंतर त्यांच्या जन्मगावी त्यांचा जीवनप्रवास मांडणारे स्मृतीदालन उभारावे अशी कल्पना पुढे आली.याबाबतचा प्रस्ताव तयार करुन पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची २२ सप्टेंबर २०१८ रोजी भेट घेतली. त्यांना ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत करुन लगेचच ५० लाखांचा निधी मंजूर केल्याचे पत्र दिले. याबाबत सर्व प्रशासकिय बाब पूर्ण केल्यानंतर सोमवार दि.७ जानेवारी २०१९ रोजी या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

दालनामध्ये हे असेलआजरा येथील कन्या आणि कुमार शाळा परिसरात जिल्हा परिषदेच्या जागेवर हे स्मृतीदालन उभारणत येणार आहे. यामध्ये सावंत यांचा जीवनप्रवास, मराठीतील आणि त्यांच्या अन्य भाषांतरित पुस्तकांची माहिती, त्यांचे हस्ताक्षर, आजऱ्यांपासून ते दिल्लीपर्यंतची छायाचित्रे, त्यांची भाषणे आणि ग्रंथसंपदा अशी मांडणी करण्यात येणार आहे. तसेच दालनामध्ये २५० हून आसनक्षमतेचे सभागृहही करण्यात येणार आहे.हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी पालकमंत्र्यांचे ओएसडी बाळासाहेब यादव, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर