कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने जोडलं ‘रक्ताचं नातं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:37+5:302021-07-03T04:16:37+5:30
इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर, सनराईज म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापूर, अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने केएमए हाऊसमध्ये रक्तदान शिबिर ...

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने जोडलं ‘रक्ताचं नातं’
इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर, सनराईज म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापूर, अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने केएमए हाऊसमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी नऊ वाजता या शिबिराचे उद्घाटन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव डॉ. किरण दोशी, खजानीस डॉ. ए. बी. पाटील, कम्युनिटी सर्व्हिस डॉ. अरुण धुमाळे, राजेंद्र चिंचणीकर, कार्यकारिणी सदस्य डॉ. राजेंद्र वायचळ, शीतल पाटील, शीतल देसाई, अश्विनी पाटील, माजी अध्यक्ष डॉ. अशोक जाधव आदी उपस्थित होते. या शिबिराच्या प्रारंभी रणजित बुगाले, वसुधा लिंग्रस, मंजिरी देवाणावर यांनी मराठी गीते सादर केली. ऐश्वर्या बेहेरे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, या असोसिएशनच्यावतीने सकाळी साडेसहा वाजता ‘डॉक्टर्स वॉक फॉर हेल्थ’ उपक्रम राबविण्यात आला. केएमए हाऊस, हॉकी स्टेडियम, सायबर चौक, राजाराम कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, माऊली चौक, शाहूमिल चौक, उमा टॉकीज चौक, गोखले कॉलेज, सुभाष रोड मार्गे केएमए हाऊस असा या उपक्रमाचा मार्ग होता. त्यात केएमएचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले.
प्रतिक्रिया
कोरोनाच्या सध्यस्थितीत जास्तीत जास्त रक्त संकलनाची गरज आहे. जेणे करून भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास रक्ताचा तुटवडा भासणार नाही. रक्त संकलनाची गरज लक्षात घेवून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. १५ ऑगस्ट रोजी पुन्हा रक्तदान शिबिराचा उपक्रम आयोजित करण्याचा ‘केएमए’चा मानस आहे.
-डॉ. आशा जाधव, अध्यक्ष, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन
चौकट
शिबिरात यांनी केले रक्तदान
या शिबिरात गजेंद्र तोडकर, रमेश सुतार, विजय ऐतवडेकर, वृषाली यादव, इंद्रजित जोशी, ओंकार चव्हाण, सागर भोसले, निखिलेश भोसले, रणजित बुगाले, महेश सोनुले, महेश कदम, नीलेश साळोखे, डॉ. शुभांगी पार्टे, अश्विनी पाटील, धनंजय कदम, कोमल कदम, राज पाटील, शीतल देसाई, गुरूनाथ ढोले, मीनाक्षी काळे, हृषीकेश बराले, जयवंत पाटील, अक्षय नाझरे, उत्तम कदम, स्वानंद जाधव, भालचंद्र गायकवाड, रघुनंदन येतावडेकर, सुरेश गुरव, संदीप बुधले, विजय जाधव, रूपाली कसबेकर, संदेश खांडेकर आदींनी रक्तदान केले.
फोटो (०२०७२०२१-कोल-मेडिकल असोसिएशन (रक्तदान) : कोल्हापुरात ‘डॉक्टर डे’ निमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. आशा जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून डॉ. वसुधा लिंग्रस, मंजिरी देवाणावर, मनीषा जाधव, शर्मिला खोत, अश्विनी पाटील, अरुण धुमाळे, किरण दोशी, राजेंद्र वायचळ, आनंद चव्हाण, अभिजित रजपूत, महेश सोनुले, मनोज जोशी उपस्थित होते.
020721\02kol_6_02072021_5.jpg
फोटो (०२०७२०२१-कोल-मेडिकल असोसिएशन (रक्तदान) : कोल्हापुरात डॉक्टर डे निमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन अध्यक्ष डॉ. आशा जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून वसुधा लिंग्रस, मंजिरी देवाणावर, मनिषा जाधव, शर्मिला खोत, अश्विनी पाटील, अरूण धुमाळे, किरण दोशी, राजेंद्र वायचळ, आनंद चव्हाण, अभिजित रजपूत, महेश सोनुले, मनोज जोशी उपस्थित होते.