शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे महापौर, उपमहापौरांची नावे बुधवारी स्पष्ट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 18:30 IST

कोल्हापूरचे महापौर-उपमहापौर कोण होणार, निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी, भाजप-ताराराणी आघाडी यावेळी तरी कॉँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडणार का, शिवसेनेचे चार नगरसेवक आपली मते कोणाच्या पारड्यात टाकणार, या उत्कंठा वाढविणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बुधवारी मिळणार आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूरचे महापौर, उपमहापौरांची नावे बुधवारी स्पष्ट होणारनिवडणूक एकतर्फी की चुरशीची ?

कोल्हापूर : कोल्हापूरचेमहापौर-उपमहापौर कोण होणार, निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी, भाजप-ताराराणी आघाडी यावेळी तरी कॉँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडणार का, शिवसेनेचे चार नगरसेवक आपली मते कोणाच्या पारड्यात टाकणार, या उत्कंठा वाढविणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बुधवारी मिळणार आहेत.

राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून महापौरपदाचे उमेदवार म्हणून कोणाचे नाव जाहीर होणार यावर या निवडणुकीतील चुरस स्पष्ट होईल; तसेच पुढील घडामोडी घडतील. त्यामुळे निवडणुकीत काय होणार, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूरच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक सोमवारी (दि. १०) होत असून त्याकरिता  बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत.

महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल पाहता महापौर, उपमहापौर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे होतील, यात शंकाच वाटत नाही; परंतु या दोन्ही पदांसाठी पक्षांतर्गत चुरस आणि संघर्ष उफाळून आला असल्यामुळे, उमेदवारी कोणाला मिळते यावरच बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून अ‍ॅड. सूरमंजिरी राजेश लाटकर, सरिता नंदकुमार मोरे, माधव प्रकाश गवंडी, अनुराधा सचिन खेडकर या मान्यवर नगरसेविकांनी आग्रही दावा केला आहे.  त्यात लाटकर आणि मोरे आघाडीवर आहेत. 

उपमहापौर पदासाठी अशोक जाधव, भूपाल शेटे, श्रावण फडतारे यांची नावे आघाडीवर होती. या यादीतील नामावलीत संजय मोहिते, शोभा कवाळे, वृषाली कदम यांचाही समावेश झाल्यामुळे कॉँग्रेसमध्येही संघर्ष असल्याचे स्पष्ट होत आहे.  या पदावर एखाद्या ज्येष्ठ नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता दिसते. स्वाभाविकच जाधव, शेटे, मोहिते यांच्यात ही चुरस राहील.

भाजप-ताराराणीचे लक्ष कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील घडामोडींवरमहापौर-उपमहापौरपदाची निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाही भाजप-ताराराणी आघाडीत फारशा हालचाली दिसत नाहीत. त्यांच्या आघाडीच्या नेत्यांचे व कारभाऱ्यांचे सगळे लक्ष कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील घडामोडींवर खिळून राहिले आहे.

दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौरपदाच्या उमेदवार जयश्री जाधव या असतील. सविता भालकर, उमा इंगळे यांची नावे चर्चेत आहे.निवडणूक जिंकण्याची आशा असेल तरच जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.

सत्ताधाऱ्यांचे प्रत्येकी चार, तर विरोधकांचे तीन अर्जराष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील यांनी मंगळवारी नगरसचिव कार्यालयातून महापौरपदासाठी चार, तर कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी उपमहापौरपदासाठी चार अर्ज नेले. भाजप - ताराराणी आघाडीतर्फे दोन्ही पदांसाठी गटनेते विजय सूर्यवंशी यांनी तीन-तीन अर्ज नेले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस