शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:41 IST

अधिकाऱ्याची नेमणूक दोन दिवसांत

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील (बाचणी) यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्याकडे दिला. येत्या दोन दिवसांत नवीन सभापती निवडीबाबत प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे.सभापतिपद हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे होते. पाटील यांनी आठ महिन्यांतच राजीनामा दिल्याने उर्वरित कालावधीसाठी त्याच पक्षाच्या संचालकाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.पाटील यांची जुलै २०२५ मध्ये सभापती म्हणून निवड झाली होती. पण, गेल्या आठ महिन्यांत संचालक मंडळात अंतर्गत धुसफूस सुरू होती. त्यांच्या विरोधात नेत्यांकडे तक्रारी गेल्या होत्या.त्यातून त्यांनी १४ मार्चला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऐकून न घेता आपणास बोलल्याचे सांगत सभापतिपदासह समिती संचालक, संताजी घोरपडे साखर कारखाना व स्थानिक संस्थांच्या सर्व पदांचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर तब्बल दहा दिवसांनी त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला.नवीन सभापती निवडीसाठी दोन दिवसांत प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून माजी आमदार के. पी. पाटील यांचे समर्थक शेखर देसाई व मेघा देसाई तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे समर्थक संदीप वरांडेकर तर जनसुराज्य पक्षाकडूनही शंकर पाटील (बारगीरकर) यांनी इच्छा व्यक्त केली आहे.संचालकपदाचा राजीनामा कधी?सूर्यकांत पाटील यांनी सभापतिपदाच्या राजीनाम्याची घाेषणा करताना संचालकपदाचाही राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सोमवारी त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. त्यांना संचालकपदाचा राजीनामा द्यायचा असल्यास ते नवीन सभापतींकडे देऊ शकतात.प्रस्तावास अखेर मंजुरीबाजार समितीने सुरक्षारक्षकांची १५ पदे रद्द करून कनिष्ठ लिपिक पदे वाढवण्याचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे दिला होता. त्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.

बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी सभापतिपदाचा राजीनामा सोमवारी दिला आहे. नवीन निवडीबाबत दोन दिवसांत प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. - नीलकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Market Committee Chairman Suryakant Patil Resigns

Web Summary : Suryakant Patil resigned as Kolhapur Market Committee Chairman after internal disputes. A new chairman will be appointed soon. Several candidates are vying for the position from different parties. Patil may still resign from his director position.