शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी पंचगंगा घाटावर मांडव, गुरुवारपासून धावणार जादा बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:34 IST

दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी पंचगंगा नदीघाटावर जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेकरूंसाठी निवारा शेड, तात्पुरते बसस्थानक, अन्नछत्राचे मांडव यांची उभारणी केली जात आहे. दरम्यान, बुधवारी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी थांबल्याचे समजल्यानंतर परिवहन महामंडळाने तातडीने जादा एस.टी. बसेस पाठवून भाविकांची सोय केली.

ठळक मुद्देजोतिबा यात्रेसाठी पंचगंगा घाटावर मांडव, शेड उभारणीगुरुवारपासून धावणार जादा बसेस

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी पंचगंगा नदीघाटावर जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेकरूंसाठी निवारा शेड, तात्पुरते बसस्थानक, अन्नछत्राचे मांडव यांची उभारणी केली जात आहे. दरम्यान, बुधवारी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी थांबल्याचे समजल्यानंतर परिवहन महामंडळाने तातडीने जादा एस.टी. बसेस पाठवून भाविकांची सोय केली.जोतिबाची चैत्र यात्रा येत्या शनिवारी होत आहे. यात्रा आता अवघ्या दोन दिवसांवर आल्याने महाराष्ट्र-कर्नाटकसह आंध्रप्रदेशमधील भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे कोल्हापुरात आले आहेत.

 

जोतिबा यात्रेकरूंसाठी बुधवारी पंचगंगा नदीघाटावर तात्पुरते शेड उभारण्यात येत होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)या भाविकांच्या सोईसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारपासून पंचगंगा नदीघाटावरून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एस.टी. बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी तात्पुरते बसस्थानक व निवारा शेड उभारण्यात येत आहे.

दुसरीकडे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनेही येथे अन्नछत्राचे आयोजन केले जाते. त्यासाठीही  गुरुवारी मंडप उभारण्यात येत आहे. जादा एस.टी. बसेस सेवा सुरू होणार आहे. मात्र बुधवारी जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक थांबले होते. ही माहिती समजताच परिवहन महामंडळाने तातडीने या मार्गावर जादा एस.टी. बसेस सोडल्या.

दर पाच मिनिटांनी गाडीयात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने दर पाच मिनिटांनी एस.टी. बसचे नियोजन केले आहे. यात्राकाळात या मार्गावरून १५० एस.टी. बसेस धावणार आहेत. यासह पुणे, सातारा, सोलापूर या विभागांकडून थेट जोतिबा डोंगर येथे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा संपताच एखाद्या प्रमुख गावी जाण्यासाठी भाविकांनी जादा गाडीची मागणी केली, तर थेट संबंधित गावापर्यंत गाडी सोडण्याचे नियोजन महामंडळाने यंदा केले आहे.

महामंडळाचे १५० कर्मचारी सेवेतयात्राकाळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एस. टी. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मित्र असे १५० जण दिवसरात्र सेवेसाठी राहणार आहेत. या दरम्यान कोणत्याही गाडीत बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्तीसाठी दोन पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 

यात्रेदरम्यान मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, पंचगंगा घाट येथून दर पाच मिनिटांनी एस. टी. बसेस असणार आहेत. तसेच जोतिबा यात्रेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोईसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे निवारे उभारण्यात आले आहेत. तरी भाविकांनी या सहज, सुलभ सेवेचा लाभ घ्यावा.- अतुल मोरेसहायक वाहतूक अधीक्षक

 

टॅग्स :Jyotiba Chaitra Yatra 2018ज्योतिबा चैत्र यात्रा २०१८kolhapurकोल्हापूर