शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अखेर तुळशीतील पाणी उपशाचा प्रश्न मार्गी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 16:48 IST

Maharashtra : शेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना.

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड (कोल्हापूर) : धरणासाठी ज्या माणसांनी स्वतःची शेती, संसार बहाल केला व विस्थापिताचा शिक्का घेऊन धरण काठावरच उर्वरित शेतीत संसार थाटला. अशी माणसे गेल्या सात वर्षापासून याच धरणातील पाणी परवाना मिळवण्यासाठी  शासन दरबारी  हेलपाटे मारून  मेटाकुटीस आली होती. पण पाणी उपसा परवाना मिळत नसल्या कारणाने उरली-सुरली शेतीही पाण्याअभावी कोरडवाहू बनली होती. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष पद येताच त्यांनी या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन गेल्या सात वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न काल मार्गी लावला.

धामोड( ता. राधानगरी ) येथील तुळशी जलाशयांमध्ये देऊळवाडी, कुदळवाडी, बुरंबाळी, आपटाळ, केळोशी खुर्द इत्यादी गावातील लोकांची शेती गेल्याने हे लोक धरणग्रस्त बनले. पैकी बहुतांशी लोकांना जलाशयातून पाणी उपसा परवाना मिळण्यासाठीचा अर्ज करून देखील पाणी परवाना मिळत नव्हता. तांत्रिक कारण पुढे करून प्रशासनाने प्रस्ताव नाकारले होते. दरम्यान, लोकांनी मंत्रालयापर्यंत हेलपाटे मारूनदेखील त्यांना न्याय मिळला नाही. आमदार प्रकाश आबिटकर यांनी या प्रश्नाची दखल घेत गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्याचा निश्चय केला.

हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी काल तुळशी धरण स्थळावरच धरणग्रस्त बांधवांची व  विभागातील अधिकार्‍यांची बैठक बोलावून हा प्रश्न स्थानिक पातळीवर निकाली काढत ज्यांना पाणी परवाना हवा आहे अशा शेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना केल्या. 

महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या पदाचा योग्य सदुपयोग करत गेल्या सात वर्षापासून तुळशी धरणग्रस्तांचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावता आला याचा आनंद आहे.आ . प्रकाश आबिटकर(उपाध्यक्ष मराराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद)

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूरWaterपाणी