शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वृध्देचे साडेतीन तोळ्याचे गंठण लंपास, राजेंद्रनगर रिंगरोडवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 15:09 IST

राजेंद्रनगर रिंगरोड येथे भजनाला निघालेल्या वृध्देच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केले. गुरुवारी (दि. १) भरदिवसा चारच्या सुमारास ही घटना घडली. पोलीसांनी नाकाबंदी करुन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतू ते मिळून आले नाहीत.

ठळक मुद्देवृध्देचे साडेतीन तोळ्याचे गंठण लंपासराजेंद्रनगर रिंगरोडवरील घटना

कोल्हापूर : राजेंद्रनगर रिंगरोड येथे भजनाला निघालेल्या वृध्देच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केले. गुरुवारी (दि. १) भरदिवसा चारच्या सुमारास ही घटना घडली. पोलीसांनी नाकाबंदी करुन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतू ते मिळून आले नाहीत.अधिक माहिती अशी, कमल यशवंत वासुदेव (वय ६९, रिंगरोड, राजेंद्रनगर) ह्या गुरुवारी ओळखीच्या महिलांसोबत सम्राटनगर बीएसएनएल आॅफिसजवळ राहणारे हसबनीस यांचे घरी भजनाच्या कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या.

यावेळी राम मंगल कार्यालयासमोर पाठिमागुन दूचाकीवरुन दोन तरुण आले. पाठिमागे लांब केसाच्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारुन काढून घेतले. त्यानंतर धूम स्टाईलने ते पसार झाले.

अचानक घडलेल्या प्रकाराने कमल वासुदेव ह्या बिथरुन गेल्या. त्यांच्या सोबत असलेल्या महिलांनी चोर..चोर म्हणून आरडाओरड केली. परंतू आजूबाजूला कोणी नागरिक नसलेने चोरटे पसार झाले.

नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा माग पोलीस काढत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोहार करीत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा