शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:49 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून कोल्हापुरातील व्यक्तीला सहा लाख रुपयांना नाशिक येथील भामट्याने गंडा घातला. संशयित महादेव संतराव कागीणकर (रा. विशाखा कॉलनी, राजीवनगर, नाशिक) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देपुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीचे आमिषनाशिकच्या भामट्याकडून कोल्हापुरातील व्यक्तीला सहा लाखांचा गंडा

कोल्हापूर : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून कोल्हापुरातील व्यक्तीला सहा लाख रुपयांना नाशिक येथील भामट्याने गंडा घातला. संशयित महादेव संतराव कागीणकर (रा. विशाखा कॉलनी, राजीवनगर, नाशिक) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, राजाराम दौलतराव पाटील (रा. दत्त कॉलनी, मंगळवार पेठ) यांची संशयित महादेव कागीणकर यांच्याशी ओळख झाली. यावेळी पाटील यांनी माझ्या मुलीला व जावयाला नोकरीची गरज असल्याचे सांगितले.

त्यावर कागीणकर याने माझी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अधिकाऱ्यांशी चांगली घसट आहे. तुमच्या मुलीचे व जावयाचे नोकरीचे काम करतो. त्यासाठी सहा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

कागीणकर याच्यावर विश्वास ठेवून पाटील यांनी रेल्वे स्टेशनसमोर त्याला पैसे दिले. मात्र, पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने त्यांनी कागीणकर याच्याकडे पैशांची मागणी केली असता तो टाळाटाळ करू लागला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी मंगळवारी (दि. १९) शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस संशयित भामटा कागीणकर याचा शोध घेत असून, या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत. 

या फसवणूकप्रकरणी तक्रारदाराने माझी भेट घेतली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.- संजय मोहिते, पोलीस अधीक्षक 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा