कोल्हापूर :सुरक्षारक्षकाला लुटले
By Admin | Updated: October 5, 2014 23:07 IST2014-10-05T22:29:18+5:302014-10-05T23:07:57+5:30
दोघांचे कृत्य : लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथील प्रकार

कोल्हापूर :सुरक्षारक्षकाला लुटले
कोल्हापूर : ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या खासगी सुरक्षारक्षकाला लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथे पाठीमागून रिक्षातून आलेल्या दोघा तरुणांनी धक्काबुक्की करून खिशातील दहा हजार किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. मधुकर अर्जुन सोनीकर (वय ६२, रा. साळोखेनगर) असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार आज, रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मधुकर सोनीकर हे गेल्या नऊ वर्षांपासून खासगी सुरक्षा कंपनीत काम करतात. एक महिन्यापासून दाभोळकर कॉर्नर येथील एलआयसी बिल्डिंग येथे सुरक्षारक्षक म्हणून ते काम करीत आहेत. आज सकाळी ते ड्यूटी संपवून चालत घरी येत होते. लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथे आले असता पाठीमागून आलेली रिक्षा त्यांच्यासमोर थांबली. त्यातून दोन तरुण उतरले. त्यांनी थेट धक्काबुक्की करीत खिशातील मोबाईल काढून घेऊन स्वयंभू गणेश मंदिराच्या दिशेने ते निघून गेले.
अचानक घडलेल्या या प्रकाराने सोनीकर घाबरले. त्यांनी घरी जाऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लूटमार करणारे तरुण २० व ३५ वर्षांचे होते. ते अंगाने मजबूत, रंगाने काळे-सावळे, अंगामध्ये पांढरे शर्ट व जीन्स पॅँट घातली होती. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे करीत आहेत. (प्रतिनिधी)