शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

"छत्रपती कुटुंबाचे घराण्याच्या नावाला साजेशे काम नाही; शाहू महाराजांचे खरे वारसदार समरजीत घाटगेच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 09:52 IST

वीरेंद्र मंडलिक यांचे खळबळजनक विधान, कोल्हापुरात गेल्या १५-२० वर्षांपूर्वी बंद पडलेली शाहू मिल त्यांना सुरू करता आलेली नाही.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेशे काम केले नसल्याचे खळबळजनक विधान याच मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी शनिवारी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

कागल तालुक्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात बोलताना वीरेंद्र यांनी शाहू महाराजांच्या नावाला साजेशे काम जनक घराणे म्हणून स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे व समरजीत घाटगे यांनी केले. मात्र, हे काम छत्रपती घराण्याला करता आले नसल्याचे विधान केले. शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग छत्रपती कुटुंबाचा नाही. कोल्हापुरात गेल्या १५-२० वर्षांपूर्वी बंद पडलेली शाहू मिल त्यांना सुरू करता आलेली नाही. त्यामुळे शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजीत घाटगेच आहेत, असा दावाही मंडलिक यांनी केला. वीरेंद्र यांच्या या विधानाने पुन्हा नवा वाद निर्माण झाला. गत आठवड्यात संजय मंडलिक यांनीही आताचे शाहू महाराज छत्रपती घराण्याचे थेट वारसदार नसून, जनता  वारसदार असल्याचे सांगत वाद ओढावून घेतला होता.

वीरेंद्र मंडलिक यांचे वय पाहता ही अशोभनीय टीका आहे. समोरचे उमेदवार कोण आहेत, त्यांच्यावर टीका करण्याची आपली योग्यता आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे कोणते मुद्देच नाहीत. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला हवी. गादी, वारस यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत.  त्यामुळे समरजित घाटगे यांनी या लोकांपासून सावध राहावे. -संजय पवार, उपनेते, उद्धवसेना

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४