शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनची दखल, वरवर स्वच्छता पण मूळ दुखणे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:59 IST

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून गुरुवारी पंचनामा केला होता. त्याच्या दणक्याने जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांमार्फत शुक्रवारी स्वच्छता केली; परंतु ती वरवरच होती. कारण तुंबलेल्या घाण पाण्याचा निचरा न होणे हे दुखणे अजून कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सवडीवरच त्यावर इलाज होणार असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनची दखलजिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहाची स्थितीवरवर स्वच्छता पण मूळ दुखणे कायम :

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून गुरुवारी पंचनामा केला होता. त्याच्या दणक्याने जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांमार्फत शुक्रवारी स्वच्छता केली; परंतु ती वरवरच होती. कारण तुंबलेल्या घाण पाण्याचा निचरा न होणे हे दुखणे अजून कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सवडीवरच त्यावर इलाज होणार असल्याचे दिसत आहे.इमारत चकाचक; पण स्वच्छतागृह कायम तुंबल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी झाली आहे. यामुळे रोगराई पसरते की काय, अशी भीती येथील कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. हे वास्तव गुरुवारी ‘लोकमत’ने समोर आणले.

यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छतागृहात औषध फवारणी करून स्वच्छता केली; परंतु तुंबलेले दुर्गंधीयुक्त पाणी तसेच राहिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच हे काम होणार आहे; परंतु त्यांना सवड नसल्याने आणखी किती दिवस हे पाणी येथे साचणार, हा प्रश्न आहे.स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात आली आहे. तसेच घाण पाणी वाहून नेणारी वाहिनी ब्लॉक झाल्याने त्यातील पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही. या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाशीही संपर्क केला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार