पाणीटंचाईचा परिणाम : शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 03:04 PM2018-03-14T15:04:51+5:302018-03-14T15:04:51+5:30

वाशिम : सद्या उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईची झळ प्रशासकीय कार्यालयांना देखील बसली असून पाण्याअभावी स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात अडकली आहेत. परिणामी, शासनाचा स्वच्छतेचा उद्देश असफल होत असल्याचे दिसून येत आहे. 

Water scarcity: Cleanliness of Government Offices in Danger! | पाणीटंचाईचा परिणाम : शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात!

पाणीटंचाईचा परिणाम : शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात!

Next
ठळक मुद्देशासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहांची प्राधान्याने स्वच्छता असावी, असे शासनाचे निर्देश आहेत. यंदा भीषण पाणीटंचाई उद्भवली असून प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे.स्वच्छतागृहांमधील नळ कायमस्वरूपी बंद राहत असल्याचे दिसून येत आहे. 


वाशिम : सद्या उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईची झळ प्रशासकीय कार्यालयांना देखील बसली असून पाण्याअभावी स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात अडकली आहेत. परिणामी, शासनाचा स्वच्छतेचा उद्देश असफल होत असल्याचे दिसून येत आहे. 
शासनामार्फत संपूर्ण राज्यात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्या धर्तीवर सर्व शासकीय इमारती व कार्यालयांमध्येही दैनंदिन स्वच्छता राखण्याबाबत विविध उपक्रम हाती घेण्यात यावे, अशा नगर विकास विभागाच्या सूचना आहेत. शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी बसत असलेल्या ठिकाणांचा परिसर स्वच्छ ठेवावा, शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहांची प्राधान्याने स्वच्छता असावी, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, यंदा भीषण पाणीटंचाई उद्भवली असून प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. वाशिमचे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक, तहसील यासह इतर प्रशासकीय कार्यालयांमध्ये सद्या विकतचे ‘फिल्टर’ पाणी घेवून तहान भागविली जात असल्याचे पाहावयास मिळते. या कार्यालयीन परिसरातील कुपनलिका पूर्णत: कोरड्या पडल्यामुळे स्वच्छतागृहांमध्ये वापरण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. स्वच्छतागृहांमधील नळ कायमस्वरूपी बंद राहत असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Water scarcity: Cleanliness of Government Offices in Danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम