शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : लोकमत इफेक्ट  : तपासणी न केलेल्या बसेसची घरोघरी जाऊन चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 18:19 IST

वारंवार मुदत देऊनही न आलेल्या स्कूल बसेसची तपासणी त्या बसमालकांच्या थेट घरी जाऊन करण्याचे आदेश गुरुवारी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिले. ही तपासणी मोटार वाहन निरीक्षक करणार आहेत.

ठळक मुद्दे तपासणी न केलेल्या बसेसची घरोघरी जाऊन चौकशीचे आदेश लोकमत इफेक्ट  : दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई

कोल्हापूर : वारंवार मुदत देऊनही न आलेल्या स्कूल बसेसची तपासणी त्या बसमालकांच्या थेट घरी जाऊन करण्याचे आदेश गुरुवारी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिले. ही तपासणी मोटार वाहन निरीक्षक करणार आहेत.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसची पुनर्तपासणी शाळा सुरू होण्यापूर्वी ३१ मे अखेर प्रादेशिक परिवहनकडून करून घेणे स्कूल बसमालकांना बंधनकारक केले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ७५० स्कूल बसेसच्या मालकांपैकी २०० बसेस मालकांनी ही पुनर्तपासणी अद्यापही केलेली नाही.तपासणी न केलेल्या या बसमालकांना प्रादेशिक परिवहनने नोटीसही बजावली आहे. तरीही अनेकांनी तिला प्रतिसाद दिलेला नाही. याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बसमालकांच्या घरी थेट जाऊन त्यांच्या बसेसची तपासणी करण्याचे आदेश प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी दिले.

दोषी आढळणाऱ्या अशा वाहनांवर कठोर कारवाईही हे कार्यालय करणार आहे. या बसेसमध्ये स्पीड गव्हर्नर, अग्निशमन यंत्र, आसनक्षमता, प्रशिक्षित चालक, पुरुष व महिला सहायक आहेत की नाहीत. सुरक्षेचे उपाय, काचांची स्थिती, टायर, आदींचीही तपासणी केली जाणार आहे.

थेट बसेस मालकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील चोकाक येथे स्कूल बसच्या अपघातानंतर हा बसेसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातून पालकांच्या वाढत्या तक्रारींची दखलही या कार्यालयाने घेतली आहे. त्यातून हा आदेश काढण्यात आला.चोकाक येथील अपघातात कंटेनर चालकासह अन्य एकाने सीट बेल्ट न बांधल्याने ते दोघे थेट समोरील काचेवर आदळले. त्यात डोक्याला अंतर्गत दुखापत होऊन त्यांचा त्यात मृत्यू झाला असावा, असा पाहणीनंतर अंदाज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारीस यांनी व्यक्त केला आहे.शाळांमध्ये स्कूल बस समितीही कार्यान्वित करण्याची विनंती ‘प्रादेशिक परिवहन’कडून शिक्षण खाते, संबंधित शिक्षण संस्थेला वारंवार केली जात आहे. त्यांच्या विनंतीला काही शाळा भीकही घालत नाहीत. या समितीत शाळांचे प्रतिनिधी, पालक, ‘प्रादेशिक परिवहन’चे प्रतिनिधी, पोलिसांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे; पण ही समिती अद्यापही कागदावरच आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. यासह बसमध्ये वेबकॅम जीपीआरएस बसविण्याच्या मागणीचा जोरही वाढू लागला आहे. त्यामुळे या बसेसमधून प्रवास करणाऱ्या मुलांचा ‘स्टेटस’ समजण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी