शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

चेतन नरके यांच्या मागे पहाडासारखे उभे राहू, सतेज पाटील यांची ग्वाही; नरके यांचा शाहू छत्रपतींना बिनशर्त पाठिंबा

By राजाराम लोंढे | Updated: April 30, 2024 19:15 IST

मुख्यमंत्र्यांवर गल्लीबोळात फिरण्याची वेळ, आमदार पी. एन. पाटील यांची टीका

कोपार्डे : चेतन नरके यांनी गेली अडीच वर्षे गाव आणि वाड्यावस्त्यांवर संपर्क मोहीम राबवली, तरीही त्यांनी थांबून मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांची अडीच वर्षांची मेहनत, कष्ट वाया जाऊ देणार नाही. आपण व आमदार पी. एन. पाटील यांच्या मागे पहाडासारखे उभे राहू, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. तर, ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’तील उमेदवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गल्लीबोळातून फिरण्याची वेळ आल्याची टीका आमदार पी. एन. पाटील यांनी केली.वाकरे (ता. करवीर) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या समर्थनार्थ डॉ. चेतन नरके यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके होते. यावेळी डॉ. नरके यांनी शाहू छत्रपती यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘करवीर’मध्ये स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांनी सहकाराची बिजे राेवली, आगामी काळात त्यांना सहकार बळकटीसाठी काम करत असतानाच अरुण नरके यांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे.शाहू छत्रपती म्हणाले, मी जरी जग फिरलो असलो, तरी डॉ. चेतन नरके यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्याकडे कोल्हापूरच्या विकासाचे व्हीजन असून, तेच घेऊन पुढे जाऊ.आमदार पी. एन. पाटील म्हणाले, शाहू छत्रपतींनी काय केले, म्हणून विरोधी उमेदवार विचारणा करत आहे, पण त्यांच्या वडिलांनी हसन मुश्रीफ यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळताे, म्हणून ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा पराक्रम केला.डॉ. चेतन नरके म्हणाले, कोल्हापूरच्या रिंगणातून थांबावे लागले, म्हणून नाराज झालो नाही. व्यासपीठावरील उपस्थिती पाहता, भविष्यातील नवी समीकरणे काय असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.स्वागत इचलकरंजीचे नगरसेवक संतोष शेळके यांनी केले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार प्रा. जयंत आसगावकर, बाजार समितीचे सभापती भारत पाटील-भुयेकर, माजी सभापती रंगराव मोळे, संभाजी पाटील-कुडित्रेकर, आपटीचे माजी सरपंच विश्वास पाटील, सत्यशील संदीप नरके आदी उपस्थित होते. आभार चंद्रकांत जाधव यांनी मानले.

आडवा पाय माराल, तर गाठ माझ्याशीलोकसभेच्या रिंगणातून माघार घेऊन चेतन नरके यांनी काय मिळवले, अशी चर्चा करणाऱ्यांनी आपला गट सांभाळा, आडवा पाय माराल, तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. मलाही मग ‘कु्ंभी’त लक्ष घालावे लागेल, असा इशाराही चेतन नरके यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती