शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Local Body Election: शिरोळमध्ये नगराध्यक्षपदासाठी काटाजोड चौरंगी निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:10 IST

चिन्हवाटपानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचे रणांगण तापणार

शिरोळ : शिरोळ पालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढतीचा सामना स्पष्ट झाला आहे; तर नगरसेवकपदासाठी तिरंगी लढत होत आहे. निवडणुकीत १० अपक्ष उमेदवार उतरले आहेत. उमेदवारी अर्जमाघारीच्या अंतिम दिवसअखेर नगराध्यक्षपदाच्या तीनजणांनी, तर नगरसेवकपदाच्या ३९ जणांनी माघार घेतली. निवडणुकीचे रणांगण स्पष्ट झाल्यामुळे आता चिन्हवाटपानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग येणार आहे.शिरोळ पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसअखेर नगराध्यक्षपदासाठी नऊ, तर नगरसेवक पदासाठी ११० अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर दोन्ही गटांतील ११६ अर्ज शिल्लक राहिले. गेल्या तीन दिवसापासून उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत नगराध्यक्ष पदासाठी तीन, नगरसेवक पदासाठी ३९ जणांनी माघार घेतली. अनेक प्रभागांमध्ये माघारीसाठी उमेदवारांची मनधरणी करण्यात आली. साम, दाम, दंडाचादेखील वापर झाला. माघारीनंतर शिवशाहू आघाडी, ताराराणी आघाडी, तसेच राजर्षी शाहू विकास आघाडीत तिरंगी लढतीचा सामना होत आहे.नगराध्यक्ष पदासाठी योगिता कांबळे, श्वेता काळे, सारिका माने, करुणा कांबळे अशी लढत होणार आहे. प्रभाग नऊ ब मधून ताराराणी आघाडीने माघार घेतली; तर बहुतांश प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभाग दोनमध्ये एक, प्रभाग तीनमध्ये दोन, प्रभाग चारमध्ये तीन, पाच एक, प्रभाग सहा एक, प्रभाग आठ एक, प्रभाग नऊ एक, प्रभाग दहामध्ये एक असे दहा अपक्ष रिंगणात उतरले आहेत. प्रभाग तीनमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक उमेदवार निवडणूक चिन्हावर उभा आहे. बुधवारी (दि. २६) चिन्हवाटपानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचे रणांगण तापणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Four-cornered Fight for Shirol Nagaradhyaksha Post; Tussle for Corporator Posts

Web Summary : Shirol faces a four-way battle for Nagaradhyaksha, with a three-way contest for corporator positions. Ten independent candidates are in the fray. After withdrawals, Shivshahu, Tararani, and Rajarshi Shahu Vikas Aghadi parties will compete. Campaigning intensifies after symbol allocation.