शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या हद्दवाढीस राज्य सरकार अनुकूल, आठ गावांचा समावेश शक्य; आदेश निघण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 13:28 IST

महापालिकेत समाविष्ट होणारी संभाव्य गावे.. जाणून घ्या

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीस राज्य सरकार अनुकूल असल्याचे पाहायला मिळत असून, नजीकच्या काळात शहराला लागून असलेल्या सात-आठ गावांचा समावेश करून हद्दवाढीवर आदेश काढण्याचा विचार केला जात आहे. याबाबत मुंबईत एक मंत्रीस्तरावर बैठक झाल्याचेही सांगण्यात येते.कोल्हापूर शहराची हद्दवाढीची अनेक वर्षांपासून मागणी आहे, परंतु या मागणीकडे गेल्या तीस-बत्तीस वर्षांत कोणत्याही सरकारने सकारात्मक दृष्टीने विचार केला नाही. काही सरकारनी या मागणीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले, तर एका सरकारने आधी तुमच्यात एकमत करा, मग हद्दवाढ करू, असे कोल्हापूरच्या जनतेलाच सुचविले होते. रविवारी झालेल्या तपोवन मैदानावरील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हद्दवाढीवर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे सांगून कोल्हापूरकरांनो, तुमच्यासमोर हात जोडतो, एकोपा करा, असे आवाहन केले होते. हद्दवाढ का होणे आवश्यक आहे, हेही त्यांनी सांगितले होते.खुद्द उपमुख्यमंत्री पवारच हद्दवाढीचे समर्थन करत असतील, तर काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे. चार दिवसांपूर्वी मंत्रालयात या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी नगररचना विभागाचे सहायक संचालक विनय झगडे उपस्थित होते. त्यांच्याकडून हद्दवाढीच्या प्रस्तावावर सद्यस्थिती काय आहे, हे समजून घेण्यात आले. बैठकीत महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावातील १८ गावे आणि दोन एमआयडीसी हद्दवाढीत घेण्याऐवजी शहराला टेकलेली सात-आठ गावे शहरात समाविष्ट करता येतील, या दृष्टीने चर्चा झाली. याबाबत हरकती, सुनावणी न घेता, वटहुकुम काढून एकतर्फी निर्णय घेता येईल का, याचीही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.

महापालिकेत समाविष्ट होणारी संभाव्य गावे..शहराला टेकलेली गावे म्हणजे कळंबा, पाचगांव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, वळीवडे-गांधीनगर, शिंगणापूर, नागदेववाडी, बालिंगा, मोरेवाडी, उचगांव या गावांचा हद्दवाढीत समाविष्ठ होऊ शकतो. असे जर केले, तर हद्दवाढीस विरोधाची धार कमी होईल आणि पालिकेला या गावांना चांगल्या सुविधा देता येतील, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर