शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कोल्हापूर : मालिका आणि चित्रपटांपेक्षा नाटकांमध्ये जिवंतपणा : गिरीष ओक, कलायात्री पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 13:18 IST

नाटक, मालिका आणि चित्रपट ही तीनही माध्यमे अभिनयासाठी आव्हानात्मक असली तरी नाटकामध्ये जिवंतपणा असतो. रिप्लेसमेंट म्हणून काम करताना अवहेलना पचवली पण नाटक सोडल नाही या अपमानातूनच मला लढण्याची ताकद मिळाली असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीष ओक यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देगिरीश ओक यांनी सादर केले तो मी नव्हेच ' नाटकातील स्वगतकपाले यांच्या हस्ते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : नाटक, मालिका आणि चित्रपट ही तीनही माध्यमे अभिनयासाठी आव्हानात्मक असली तरी नाटकामध्ये जिवंतपणा असतो. नाटक आपल्याला प्रत्यक्ष व्यक्तीच्या सादरीकरणातून भावभावनांचे अनुभव देवून जाते. डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले तरी मी त्यात स्थिरावलो नव्हतो. नाटक आवडायचे म्हणून नशीब आजमवायला मुंबईत आलो. रिप्लेसमेंट म्हणून काम करताना अवहेलना पचवली पण नाटक सोडल नाही या अपमानातूनच मला लढण्याची ताकद मिळाली असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीष ओक यांनी व्यक्त केले.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात गुरूवारी डॉ. गिरीष ओक यांना अथौपेडिक सर्जन जिनेश्वर कपाले यांच्या हस्ते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी आपला अभिनय प्रवास उलगडला. कमला कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. सुजय पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत हा संवाद सुरेख खुलवला.डॉ. ओक म्हणाले, जयशंकर दानवे हे मोठे कलाकार होते. माज्या दीपस्तंभ या नाटकातील भूमिका दानवे यांच्या खलनायकी अभिनयाची आठवण करून देते. दिपस्तंभ ते वेलकम जिंदगी या रंगभूमीवरील प्रवासाबाबत ते म्हणाले, प्रभाकर पणशीकरांच्या ' तो मी नव्हेच ' नाटकात एक भूमिका रिप्लेसमेंट म्हणून मिळाली. पणशीकर या एकमेव व्यक्तीने माझ्या अभिनयाला जोखले आणि त्यांच्यानंतर ते नाटक माझ्याकडे आले .

सध्याच्या युगात फसवण्याची साधन आणि काही थोडे बदल करुन हे नाटक आजही प्रेक्षक पसंतीस उतरत आहे . यानंतर यू टर्न, ती फुलराणी, कुसुम मनोहर लेले, वेलकम जिंदगी अशी कित्येक नाटके मी केली. एखाद्या भूमिकेशी तुलना झाली की मला त्रास होतो . त्यामुळे ती फुलराणी या नाटकातून मला मानसीक समाधान मिळू शकले नाही. यानंतर काही चित्रपट, मालिका केल्या. लेखनही सुरु होते.मुलाखतीनंतर गिरीश ओक यांनी तो मी नव्हेच ' नाटकातील स्वगत सादर केले. जयश्री दानवे यांनी प्रास्ताविक केले. अनुपमा चव्हाण यांनी मानपत्र वाचन केले. ऐश्वर्या बेहरे यांनी सूत्रसंचलन केले. राजदर्शन दानवे यांनी आभार मानले. यावेळी सुधीर पेटकर, चंद्रकांत जोशी, यशवंत भालकर, दिलीप बापट, श्रीकांत डिग्रजकर उपस्थित होते .

 

 

टॅग्स :Girish oakगिरिश ओकkolhapurकोल्हापूर