शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
4
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
5
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
6
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
7
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
8
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
9
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
10
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
11
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
12
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
13
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
15
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
16
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
17
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
18
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
19
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
20
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

कोल्हापूर : ‘विधि’चे पेपर मराठीतून सोडविण्यास परवानगी द्या, ‘मनविसे’ची कुलगुरूंकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 17:15 IST

विधी (लॉ)चे पेपर (प्रश्नपत्रिका) मराठी माध्यमातून सोडविण्यास परवानगी द्यावी. शिवाजी विद्यापीठातील तक्रार निवारण समिती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) शुक्रवारी येथे केली. ‘मनविसे’च्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले.

ठळक मुद्दे‘विधि’चे पेपर मराठीतून सोडविण्यास परवानगी द्या, ‘मनविसे’ची कुलगुरूंकडे मागणी;तक्रार निवारण समिती कार्यान्वित करा

कोल्हापूर : विधी (लॉ)चे पेपर (प्रश्नपत्रिका) मराठी माध्यमातून सोडविण्यास परवानगी द्यावी. शिवाजी विद्यापीठातील तक्रार निवारण समिती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) शुक्रवारी येथे केली. ‘मनविसे’च्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले.विद्यापीठामध्ये विधि विभागाची परीक्षा ही इंग्रजी माध्यमातून घेतली जाते; पण आपल्या येथील अनेक विद्यार्थी हे मराठी माध्यमात शिकत असल्यामुळे त्यांना ही परीक्षा देणे कठीण जाते. राज्य शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील सर्व शासकीय कामकाज हे मराठीतून चालावे, असे स्पष्ट आदेश शासनाकडून संबंधित सर्व विभाग, शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे. जर, न्यायालयामध्ये मराठीतून कामकाज असेल, तर विधी विभागाच्या पदवीसाठी मराठीतून शिक्षण, पेपर सोडविण्यास परवानगी दिली पाहिजे.

मराठीतून पेपर सोडविण्याची संधी मुंबई, नागपूर विद्यापीठांमध्ये आहे, तरी या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालून किमान येणाऱ्या परीक्षेमध्ये मराठीतून पेपर सोडविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. विद्यापीठातील तक्रार निवारण समितीचे कार्यालय कोणत्या इमारतीमध्ये आहे. त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात नाही. ही समिती कागदोपत्री असल्याचे जाणवते. संंबंधित समिती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

शिष्टमंडळात ‘मनविसे’चे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, शहराध्यक्ष मंदार पाटील, राहुल ढवळे, उत्तम वंदुरे, प्रसाद साळोखे, संतोष खटावकर, अमर ढेरे, रोहित जाधव, आदी उपस्थित होते.

सकारात्मक कार्यवाहीची ग्वाहीया मागण्यांच्या अनुषंगाने शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासमवेत चर्चा केली. त्यावर या दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही कुलगुरूंनी दिली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठMNSमनसेkolhapurकोल्हापूर