शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  फुलेवाडी जकात नाक्यानजीक जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:14 IST

कोल्हापूर ते गगनबावडा या मुख्य मार्गावर फुलेवाडी जकात नाका येथे शिंगणापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे रस्त्यावर पाणीच पाणी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. लाखो लिटर पाणी रस्त्यावरुन वाहून जात असून गेले आठ दिवस ही परिस्थिती आहे. महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देफुलेवाडी जकात नाक्यानजीक जलवाहिनीला गळतीआठवड्यानंतरही अधिकाऱ्यांचे दर्लक्ष : लाखो लिटर पाणी वाया ;वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर : कोल्हापूर ते गगनबावडा या मुख्य मार्गावर फुलेवाडी जकात नाका येथे शिंगणापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे रस्त्यावर पाणीचपाणी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. लाखो लिटर पाणी रस्त्यावरुन वाहून जात असून गेले आठ दिवस ही परिस्थिती आहे. महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.गेल्या आठवड्यात फुलेवाडी जकात नाका येथे मुख्य रस्त्यावर शिंगणापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे दुरुस्ती काम महापालिका प्रशासनाच्यावीने करण्यात आले आहे. पण दुरुस्तीकामानंतर या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे जकात नाका परिसरात रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत आहेत.

फुलेवाडी जकात नाका परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी त्यामुळे संपूर्ण रस्ता खराब झाला असून रस्ता खड्डेमय झाला आहे. सुमारे आठवडाभर ही अवस्था असून याकडे महापालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कोल्हापूर ते गगनबावडा या मुख्य मार्गावर फुलेवाडी जकात नाका परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.

फुलेवाडी जकात नाका परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने रोज किमान आठवडाभर वाहतुकची कोंडी होऊन सुमारे दोन किमीपर्यत वाहनांच्या रांगा लागत आहेत.या रस्त्यावर बहुतांशी अवजड वाहतुक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच रस्त्यावर पाण्याने भरलेल्या खड्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन पश्चिमेला बालिंगापर्यत तर पूर्वेला रंकाळा चौपाटीपर्यत दोन्हीही बाजूला किमान दोन किमी पर्यतच्या लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे वाहनधारक तसेच नागरीकांतून महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. गेले आठवडाभर ही अवस्था असून त्याकडे अधिकाºयांचे अक्षम दर्लक्ष होत आहे.

एकिकडे रास्ता रोको, दुसरीकडे रस्त्यावर पाणीशहरात पाणी भरपूर प्रमाणात असतानाही फक्त नियोजनाअभावी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी मिळत नसल्याने रास्ता रोको सारखी आंदोलन होत असताना मात्र फुलेवाडी जकात नाका परिसरात रस्त्यावर लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून परिसरात मोठ्या प्रमाणात तुंबून राहीले आहे.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरWaterपाणी