शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कोल्हापूर : लॉरी आॅपरेटर्स चा देशव्यापी ‘चक्का जाम’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:38 IST

डिझेल दरवाढ रद्द व्हावी, यासह अन्य न्याय्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उजळाईवाडीजवळील मयूर पेट्रोल पंपालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दीड तास वाहतूक रोखून धरत ‘चक्का जाम‘ आंदोलन केले.

ठळक मुद्देउजळाईवाडी महामार्गावर एक-दीड तास रोखून धरली वाहतूकमागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा

कोल्हापूर : डिझेल दरवाढ रद्द व्हावी, यासह अन्य न्याय्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उजळाईवाडीजवळील मयूर पेट्रोल पंपालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दीड तास वाहतूक रोखून धरत ‘चक्का जाम‘ आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दुपारी साडेबारानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनने डिझेल दरवाढ रद्द व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी कोल्हापूरजवळील उजळाईवाडी मयूर पेट्रोल पंपालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर ‘चक्का जाम’ आंदोलन केले. त्यामुळे काही काळ महामार्गावर वाहनांच्या अशा रांगा लागल्या होत्या. (छाया : दीपक जाधव)आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या हाकेला साथ देत कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्सनीही वाहतूकदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता उजळाईवाडी येथे ‘चक्का जाम’ आंदोलन केले. त्यात जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनसह वाळू वाहतूकदार, टेम्पो, टँकर, आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.यावेळी डिझेल दरवाढ रद्द करा; टोल प्रक्रिया पारदर्शी करावी. ‘थर्ड पार्टी’ विमा हप्त्यामधील वार्षिक दरवाढ रद्द करावी. जीएसटी व ई-वे बिलातील अडचणी, भाडे देण्यासाठी होणाऱ्या विलंबात सुधारणा करावी. पर्यटन वाहनांसाठी दीर्घ मुदतीसाठी आॅल इंडिया परमिट मिळावे, आरटीओ व पोलिसांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. आयकर कलम ४४ ए नुसार बेकायदेशीरपणे आकारणी होणारा आयकर रद्द करा, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.मयूर पेट्रोल पंपालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हा सकाळी अकरा ते दुुपारी साडेबारा वाजेपर्यंत असोसिएशनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रोखून धरला होता. यात परराज्यांहून आलेली अवजड वाहने अडवून ठेवली जात होती. त्यामुळे काही वेळ रांगा लागल्या. त्यामुळे आंदोलनकर्ते जसे ट्रक, ट्रेलर अडवतील तसे बाजूला घेण्याच्या सबबीखाली पुढे असलेले काहीजण त्या अवजड वाहनांना वाट करून देत होते. त्यामुळे दुपारी बारानंतर तुरळक प्रमाणात वाहने अडविली जात होती. ती पुन्हा पोलीस मार्र्गस्थ करीत होते.

दुपारी साडेबारानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. आंदोलनकर्त्यांनी त्यानंतर आपला मोर्चा मार्केट यार्ड परिसरातील रेल्वे गुड्स यार्डकडे वळविला. त्या ठिकाणी धान्य उतरविण्यासाठी आलेल्या वाहनांना माल उतरवून झाल्यानंतर आपली वाहने रस्त्याकडेला लावण्याचे आवाहन केले; तर मार्केट यार्डमध्ये माल उतरविण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना माल उतरविल्यानंतर वाहने रस्त्याकडेला लावण्याच्या सूचना दिला.दिवसभरात शाहूपुरी, मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरी, एम.आय.डी.सी. गोकुळ शिरगाव, शिरोली, आदी परिसरातील ट्रान्स्पोर्ट कंपन्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नव्याने कोणीही वाहतूकदार मालाची भरणी अथवा उतरणी करीत नसल्याचे चित्र होते. अनेक ट्रकमालकांनी स्वत:हून आपले ट्रक शाहूपुरी, महामार्गालगत बाजूला लावले आहेत.

या आंदोलनाचे नेतृत्व असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विजय भोसले, शिवाजी चौगुले, जगदीश सोमय्या, विजय पोवार, राहुल कवडे, किरण निकम, राजू पाटील, शिवराज माने, विजय पाटील, विजय साळोखे, महादेव माने, विजय तेरदाळकर, आदी उपस्थित होते.

या देशव्यापी आंदोलनात कोल्हापुरातील १६ हजारांहून अधिक वाहतूकदार व ५०० हून अधिक ट्रान्स्पोर्टधारकही सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास शनिवारपासून आंदोलन तीव्र केले जाणार आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामkolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी