शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
4
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
5
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
9
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
10
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
11
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
12
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
13
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
14
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
15
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
16
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
17
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
18
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
19
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
20
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई

कोल्हापूर : पिरवाडीतील हॉटेलमध्ये युवकावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:11 AM

पिरवाडी (ता. करवीर) येथील एका हॉटेलवर जेवायला गेलेल्या तरुणावर पूर्व वैमनस्यातून चाकूहल्ला केला. पवन सुहास सरनाईक (वय २६, रा. साई कॉलनी, आर. के. नगर, पाचगाव) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री घडली.

ठळक मुद्देपिरवाडीतील हॉटेलमध्ये युवकावर चाकू हल्लाआठ जणांवर गुन्हा : पूर्व वैमनस्यातून कृत्य

कोल्हापूर : पिरवाडी (ता. करवीर) येथील एका हॉटेलवर जेवायला गेलेल्या तरुणावर पूर्व वैमनस्यातून चाकूहल्ला केला. पवन सुहास सरनाईक (वय २६, रा. साई कॉलनी, आर. के. नगर, पाचगाव) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री घडली.याप्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित सूरज तिवले, आकाश डोंगळे (रा. शिवाजी पेठ), अक्षय हात्तेकर (रा. लक्ष्मीपुरी), जावेद (पूर्ण नाव नाही) यांच्यासह तीन अनोळखी व्यक्तींवर खुनाचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे समजते.अधिक माहिती अशी, फिर्यादी पवन सरनाईक व संशयित सूरज तिवले यांच्यामध्ये २०१५ मध्ये कॉलेजमधील ट्रॅडिशनल डे च्या वादातून हाणामारी झाली होती. दोघांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या होत्या. पवन सरनाईक याच्या वाढदिवसानिमित्त तो मित्रांना घेऊन पिरवाडी येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री जेवणासाठी गेला होता.

या ठिकाणी संशयित जेवणासाठी आले होते. यावेळी जेवण करीत असताना संशयित तिवले याने पूर्वीच्या वादातून पवनला तुला आता सोडत नाही, असे म्हणून चाकुने व लाकडी ओंडक्याने हल्ला केला. त्यामध्ये डोक्यात वर्मी घाव लागून पवन गंभीर जखमी झाला.

त्याच्या मित्रांनी त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती समजताच करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सोमवारी रात्री उशिरा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर