शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

कोल्हापूर : काव्यमैफिलीतून रसिकांच्या काळजाचा ठाव : रामदास फुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 16:30 IST

कृषीविषयक वास्तवाची जाणीव, वास्तववादी राजकारण, प्रेम शेतीच्या जाणिवा अशा एक ना अनेक कविता सादर करीत कवी अरुण म्हात्रे, प्रा. सुरेश शिंदे, प्रा. संजीवनी तडेगावकर, प्रशांत मोरे, भरत दौंडकर यांनी रसिकांच्या काळजाचा जणू ठावच घेतला.

ठळक मुद्देकाव्यमैफिलीतून रसिकांच्या काळजाचा ठाव : रामदास फुटाणे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा - मराठी चित्रपट महामंडळ आयोजित अमृतमहोत्सवी सत्कार

कोल्हापूर : कृषीविषयक वास्तवाची जाणीव, वास्तववादी राजकारण, प्रेम शेतीच्या जाणिवा अशा एक ना अनेक कविता सादर करीत कवी अरुण म्हात्रे, प्रा. सुरेश शिंदे, प्रा. संजीवनी तडेगावकर, प्रशांत मोरे, भरत दौंडकर यांनी रसिकांच्या काळजाचा जणू ठावच घेतला. निमित्त होतं, मंगळवारी सायंकाळी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कवी, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, ‘वात्रटिका’कार रामदास फुटाणे यांच्या अमृतमहोत्सवाचे.मैफिलीची सुरुवात कवी प्रा. सुरेश शिंदे यांनी वाड्यावर पाच झेंडं, मातीत नाही पिकवलं तरी चाललं, मतं कशी पेरायची, ते पाण्याला आग लावतील, त्यावर आइस्क्रीम तयार करतील, आपण असे कसे, ‘सालोसाल पेरलं मातीत जिरलं ’, अशी; तर कवी भरत दौंडकर यांनी ‘गुंठा गुंठा जमीन विकून गोफ गळ्यात’, ‘उंच उंच उडायला शिकवते माती, खोल खोल गाडायला मागे पुढे पाहत नाही माती ’, अशी शेतीवर आधारित कविता सादर केली.

कवी प्रशांत मोरे यांनी स्त्रीभू्रण हत्येवरील ‘जीव शिणला का गं बया,’, ‘मैना कवितेतील एका कुंकवापाई मैना उडून जाईल’, ‘एका तुफानाला सच्चे दिन देता का कोणी?’ ‘शिवलीस का माझी पहिली पायरी’, तर प्रा. संजीवनी तडेगावकर यांनी ‘रीत माझी येडी खुळी,’ ‘रांगोळी काढताना मीच विसकटून गेले, रंगाचं असंच असत,’ ‘दाटतं ते का मनी हुरहुर काळीज आटतं’ अशा स्त्रीमनावरील काव्यपंक्ती सादर केला.

कवी अरुण म्हात्रे यांनी रामदास फुटाणे यांच्यावरील ‘कटपीस लैलो’, तर ‘२५ वर्षे झाली तरी या ‘टोपी’खाली दडलंय काय?’, ‘वेळच निराळी’ अशा एक ना अनेक मनाचा ठाव घेणाऱ्या कविता सादर करीत उत्तरोत्तर कार्यक्रमात रंगत आणली.यावर ‘वात्रटिका’कार रामदास फुटाणे यांनी शाळेला पैशाची अन् मुलाला शाळेची, गरजलेल्याला तहान, म्हणून आपला भारत महान’, स्त्री कधी मंदिरातील विणा, तर कधी ए.के. ४७’, असा कळस चढविला. मैफिलाची अखेर कवी अरुण म्हात्रे यांनी टीव्ही मालिका ‘उंच माझा झोका’मधील शीर्षकगीताने केली. 

 

टॅग्स :ramdas phutaneरामदास फुटाणेkolhapurकोल्हापूर