शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात कात्यायनी मंदिरात चोरी, चांदीचे दागिने केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:51 IST

कोल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या कात्यायनी देवीच्या मंदिरातील दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी पंचारती, देवीच्या दोन मुकुटासह अंदाजे दोन किलो वजनाच्या चांदीचे दागिने पळवून नेले. बुधवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देकोल्हापूरात कात्यायनी मंदिरात चोरीचांदीचे दागिने केले लंपास

कोल्हापूर : कोल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या कात्यायनी देवीच्या मंदिरातील दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी पंचारती, देवीच्या दोन मुकुटासह अंदाजे दोन किलो वजनाच्या चांदीचे दागिने पळवून नेले. बुधवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.कोल्हापूर शहराजवळच असलेल्या कात्यायनी मंदिराला प्राचीन परंपरा आहे. शहराच्या अगदी जवळच हे क्षेत्र असल्याने येथे परिसरातील भाविक आणि पर्यटकही भेट देत असतात. या मंदिराच्या परिसरातच रामचंद्र विष्णु गरव (बालिंगा) हे पुजारी कुटूंबियांहसह राहतात.

बुधवारी पहाटे ते शिरस्त्याप्रमाणे पूजा करण्यासाठी मंदिरात आले, तेव्हा मंदिराचा लोखंडी दरवाजा तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता त्यांना देवीच्या गर्भगृहातील संस्थानकालीन पंचारती, चांदीचे दोन मुकुटासह चांदीचे दागिने चोरल्याचे आढळले. मंदिराच्या दर्शन मंडपातील छोटे लाकडी दरवाजे व लोखंडी कपाटही चोरट्यांनी उचकटले होते. गुरव यांनी चोरीची माहिती करवीर पोलिसांत दिली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मंदिराच्या दर्शन मंडपातील छोटे लाकडी दरवाजे व लोखंडी कपाटही चोरट्यांनी उचकटले.

करवीरचे पोलिस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. मंदिरातील दोन चांदीची ताटे, देणगीची काही रक्कम तसेच पितळेची भांडी चोरट्यांनी चोरलेली नाहीत, शिवाय गाभाऱ्यातील कपाटांची कुलपं काढून चोरी केल्याचे आढळून येते. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण केले, परंतु श्वानाने मंदीराच्या आवारातून फक्त मुख्य रस्त्यापर्र्यतच माग काढला.देवस्थान समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या या मंदिराचा परिसर निर्जन आहे. येथे सुरक्षा रक्षकही नसल्याने पुजारी गुरव यांनी स्वत: सहा सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र गेल्या तीन दिवसापासून ते बंद आहेत. त्यामुळे मंदिर परिसराची खडानखडा माहित असणाऱ्यांनीच चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर