शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जिवा-शिवासोबत जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 17:16 IST

दारात रांगोळी, लाडक्या जिवा-शिवाच्या बैलजोडीची आंघोळ, शिंगांना आकर्षक रंग, गळ्यात घंटा, अंगावर छान झूल, पायात घुंगरू अशी सजावट, औक्षण, पुरणपोळीचा नैवेद्य आणि घरोघरी मातीच्या बैलजोडीचे पूजन अशा उत्साहात गुरुवारी कोल्हापूर शहर व जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला. या सणानिमित्त नागरिकांनी शेतात राबणाऱ्या आणि घरात समृद्धता आणणाऱ्या या मूकप्राण्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.

ठळक मुद्देजिवा-शिवासोबत जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा सजावट, औक्षण, घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य

कोल्हापूर : दारात रांगोळी, लाडक्या जिवा-शिवाच्या बैलजोडीची आंघोळ, शिंगांना आकर्षक रंग, गळ्यात घंटा, अंगावर छान झूल, पायात घुंगरू अशी सजावट, औक्षण, पुरणपोळीचा नैवेद्य आणि घरोघरी मातीच्या बैलजोडीचे पूजन अशा उत्साहात गुरुवारी कोल्हापूर शहर व जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला. या सणानिमित्त नागरिकांनी शेतात राबणाऱ्या आणि घरात समृद्धता आणणाऱ्या या मूकप्राण्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी कर्नाटकी, तर काही ठिकाणी महाराष्ट्रीय (देशी) बेंदूर साजरा केला जातो. कोल्हापूर शहरासह पश्चिमेकडील काही गावे व सीमाभागातील गावात कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे सकाळपासूनच घरोघरी तयारी सुरू होती.

लाडक्या जिवा शिवाच्या बैलजोडीची आंघोळ, शिंगांना आकर्षक रंग, गळ््यात घंटा, अंगावर छान झूल, पायात घुंगरू अशी सजावट, औक्षण, पुरणपोळीचा नैवेद्य अशा उत्साहात गुरुवारी कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला. यानिमित्त पंचगंगा नदीघाटावर बैलांना छान सजवण्यात आले होते. (छाया : दीपक जाधव) 

महिलांनी दारात सडा, रंगीबेरंगी रांगोळी घातली, दारात पिंंपळपानाचे तोरण बांधण्यात आले. ज्यंंच्या घरी बैल, गायी नाहीत अशा कुटुंबांनी कुंभारांनी बनविलेल्या मातीच्या बैलांची देव्हाऱ्यावर पूजा केली. त्यांना रंग लावून सजविण्यात आले होते. या बैलांनाच त्यांनी गोड नैवेद्य दाखविला.गाय, बैल असणाऱ्या शेतकऱ्यांनी सकाळी लवकर उठून बैल व गायींना पंचगंगा नदीसह पाणवठ्यांवर नेऊन स्वच्छ अंघोळ घातली. त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी करून रंगीबेरंगी फुगे, गळ्यात फुलांच्या माळा बांधल्या. अंगावर विविध रंगांच्या झुली पांघरून बैलांना सजवले.

काही जणांनी बैलांच्या अंगावर गुलाल, अष्टगंध, झुल, घुंगरू, अशी सजावट करून हलगीच्या ठेक्यावर पंचगंगा नदीपासून मिरवणूक काढली. त्यानंतर घरात आल्यानंतर सुहासिनीनी बैलांचे औक्षण केले, पुरणपोळी, कडबोळ्यांचा नैवेद्य त्यांना खाऊ घालून कृतज्ञता व्यक्त केली. सीमाभागातही मोठ्या उत्साहात बेंदूर साजरा करण्यात आला. काही ठिकाणी सजविलेल्या बैलांच्या स्पर्धाही घेण्यात आल्या.

 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर