शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भातील जनसुनावणी : ठराव, निवेदने देण्यासाठी गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 17:38 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील जनसुनावणीसाठी सोमवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठा समाजाच्या विविध संस्था, संघटनांकडून आरक्षणाच्या समर्थनार्थ ठराव देण्यासाठी गर्दी झाली होती.

ठळक मुद्देप्रत्येक तालुक्यातील दोन गावांचा सर्व्हे होणार : एम. जी. गायकवाड समर्थनार्थ ठराव, निवेदने देण्यासाठी संस्था, संघटनांची गर्दीकडेकोट पोलीस बंदोबस्त

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील जनसुनावणीसाठी सोमवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठा समाजाच्या विविध संस्था, संघटनांकडून आरक्षणाच्या समर्थनार्थ ठराव देण्यासाठी गर्दी झाली होती.

कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ठराव, निवेदने, अर्ज घेऊन समाजबांधव या ठिकाणी येत होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मराठा समाजाचे आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावे नमुना सर्वेक्षणासाठी निवडून काम सुरू केले जाईल, असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड यांनी सोमवारी येथे सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी सुरू झाली. यावेळी आयोगाचे सदस्य प्रा. चंद्रशेखर देशपांडे, डॉ. दत्तात्रय सराफ, सुधीर ठाकरे, डॉ. प्रमोद येवले, रोहिदास जाधव, डॉ. सुवर्णा रावळ, प्रा. राजाभाऊ करपे, डॉ. भूषण कर्डिले, सदस्य सचिव डी. डी. देशमुख यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत उपस्थित होते.सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरुवात होऊन आयोगाने संघटनांकडून मागण्यांची निवेदने, ठराव स्वीकारून व्यक्तिगत मतेही ऐकून घेतली. कोल्हापूरसह सांगली येथील समाजबांधव मोठ्या संख्येने आले होते.

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन सादर करत चर्चा केली. मराठवाड्यातील समाजाचे आर्थिक मागासलेपण तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातही सर्वेक्षण करावे, इतर मागास प्रवर्गात समावेश करून आरक्षण मिळावे, अशी मागणी करून मराठा समाज हा मागास होता हे राजर्षी शाहूंच्या पत्रात नमूद असल्याचा पुरावाही संघटनेकडून आयोगाला देण्यात आला.कोल्हापुरातील सकल मराठा समाज, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्यासह व्यक्तिगतरीत्या आयोगाकडे निवेदने, अर्ज व ठराव सादर केले. दुपारपर्यंत आजरा, चंदगड, गडहिंग्लज पंचायत समितींसह आजरा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींचे ठराव, करवीर तालुक्यातील खेबवडे, गगनबावडा तालुक्यातील असंडोली, तळये ग्रामपंचायतींनी ठराव सादर केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarathaमराठा