शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  इराणी चित्रपट महोत्सव शुक्रवारपासून : चंद्रकांत जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 11:14 IST

कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्यावतीने २५ ते २७ तारखेदरम्यान समकालीन इराणी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व सचिव दिलीप बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देइराणी चित्रपट महोत्सव शुक्रवारपासून : चंद्रकांत जोशी कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे आयोजन

कोल्हापूर : कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्यावतीने २५ ते २७ तारखेदरम्यान समकालीन इराणी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व सचिव दिलीप बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.शाहू स्मारक भवनात शुक्रवारपासून रोज सायंकाळी साडेपाच वाजता हा महोत्सव होईल. या कार्यक्रमाला फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटीज आॅफ इंडिया आणि कल्चरल हाऊस आॅफ द इस्लामिक रिपब्लिक इराण यांचे सहकार्य लाभले आहे.

फिल्म सोसायटीतर्फे दर महिन्यात जागतिक सिनेमा माध्यमाची ओळख करून दिली जाते. त्याअंतर्गत होत असलेल्या या महोत्सवात पहिल्या दिवशी घोब्रान मोहम्मद पौर दिग्दर्शित हॅलो मुंबई व मोहम्मद रेझा रम्हानी दिग्दर्शित ब्लिडींग हार्ट हे चित्रपट दाखविले जातील.

शनिवारी (दि. २६) मोहम्मद रेझा रम्हानी दिग्दर्शित अंडर द स्मोकी रूफ व मोहम्मद दही करिमी दिग्दर्शित ह्युमन कॉमेडी हे चित्रपट प्रदर्शित होतील. रविवारी (दि. २७) मोहम्मद रहेमनानी दिग्दर्शित ‘बेंच सिनेमा’ हा बहुचर्चित चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर इराणी चित्रपटावर चर्चा होणार आहे.जगभरातील क्रांतिपर्व सिनेमाचे वारे सन १९९७ पासून इराणमध्येही वाहू लागले. दहशतीच्या, संघर्षाच्या सावटात इराणचे सांस्कृतिक विश्व, समाजजीवन राजकीय निर्बंधाच्या जोखडाखाली दबून देले असता त्यातून वाट काढणारे चित्रपट तयार झाले.

माजिद माजिदी या दिग्दर्शकाने इराणच्या सिनेमाचा क्रांतिकारी चेहरा समोर आणला इराणची ओळख सांस्कृतिक स्तरावर नेली. काही दिग्दर्शकांना देश सोडावा लागला; पण चित्रपटांची निर्मिती सुरूच राहिली. असेच काही समकालीन चित्रपट या महोत्सवात दाखविले जाणार आहेत. महोत्सवाच्या प्रवेशिका शुक्रवारपासून सायंकाळी साडेचार वाजता शाहू स्मारक भवनात उपलब्ध असतील तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक