शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कोल्हापूर : अपात्र नगरसेवकांना कामकाजात भाग घेण्यास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:49 IST

कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवक पदावर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना येथून पुढे महापालिकेच्या कामकाजात भाग घेऊ देणार नाही. तसा निरोप संबंधित नगरसेवकांना दिला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देअपात्र नगरसेवकांना कामकाजात भाग घेण्यास मज्जावआयुक्त चौधरी : औपचारिक निर्णयाची जबाबदारी सरकारची

कोल्हापूर : आरक्षीत प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे हे निवडणुक आयोगाच्या कायद्यानुसार बंधनकारक असून कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी या नियमाचा भंग केला असल्यामुळे ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या दिवसापासून ते नगरसेवकपदावर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना येथून पुढे महापालिकेच्या कामकाजात भाग घेऊ देणार नाही. तसा निरोप संबंधित नगरसेवकांना दिला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार संबंधित १९ नगरसेवकांना औपचारीक नोटीस देऊन नगरसेवक रद्दची कारवाई करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारच्या नगरविकास विभागाची असून तसे अधिकार २८ मार्च २०१६ च्या अधिसुचनेनुसार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. त्यामुळे पुढील कारवाई ही नगरविकास विभागामार्फतच होईल. आयुक्तस्तरावर याबाबत काहीही कारवाई होणार नाही, असे स्पष्टीकरण चौधरी यांनी यावेळी दिले.गेल्या काही दिवसात नगरसेवक अपात्रतेबाबत उलट सुलट बातम्या येत आहेत. या प्रकरणात महानगरपालिकाची कोणतीच भुमिका राहिलेली नाही. ज्या दिवशी न्यायालयाचा निकाल पुढे आला त्या दिवसापासून १९ नगरसेवकांचे पद पूर्वलक्षी प्रभावाने आपोआपच रद्द झाले आहे. आता त्यांना औपचारिकपणे कळविण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. म्हणूनच महापालिकेमार्फत आवश्यक ती सर्व माहिती नगरसेवकनिहाय सरकारला कळविली आहे. आम्हाला कारवाईचे अधिकार नसल्याने आम्ही सरकारकडून कोणतेही मार्गदर्शन मागविलेले नाही, असा खुलासही त्यांनी केला.यापुढे १९ अपात्र नगरसेवकांना ते नगरसेवकपदावर राहिलेलेच नसल्यामुळे महानगरपालिकेच्या कोणत्याही कामकाजात सहभाग घेता येणार नाही. तशी तोंडी समज नगरसचिव दिवाकर कारंडे हे नगरसेवकांसह महापौर व स्थायी समिती सभापतींना देतील. महापालिका म्हणून आमची जबाबदारी तेवढीच राहिल.आम्हाला कोणतीही घाईगडबड करायची नाही. संबंधित अपात्र नगरसेवकांना कामकाजात भाग घेण्यास मज्जाव केला नाही तर कोणत्या अधिकारात ते कामकाजात भाग घेत आहेत असे आम्हाला विचारले जाऊ शकते. संबंधित नगरसेवकांनाही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माहित असल्यामुळे त्यांनी स्वत:हून कामकाजात भाग घेऊ नये. त्यांची ती जबाबदारी आहे, असे आयुक्त म्हणाले.

  1. महापालिकेतील १९ नगरसेवक अपात्र.
  2.  औपचारिक नोटीस देण्याचे अधिकार नगरविकास विभागास.
  3. आजच्या घडीला १९ नगरसेवकांचे पद रद्द, ते नगरसेवक राहिले नाहीत.
  4. महापालिकेचे कामकाज करण्यास मज्जाव.

 

मग कोणत्या अधिकारात सांगणार?आयुक्त अभिजित चौधरी यांनी १९ नगरसेवकांना अपात्रतेची औपचारीक नोटीस देण्याचा अधिकार हा राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचा आहे असे सांगत आहेत. जर नगरविकास विभागाला तसा अधिकार असेल तर मग संबंधितांना कामकाजात भाग घेऊ नका असे तोंडी सांगण्याचा अधिकार मनपा अधिकाऱ्यांना कसा? असा प्रश्न या निमित्ताने तयार होणार आहे. या प्रश्नावरुन अधिकारी व नगरसेवक यांच्यात संघर्ष उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाCaste certificateजात प्रमाणपत्रkolhapurकोल्हापूर