शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नोंदणीला वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:53 IST

‘आरोग्यासाठी धावा’ अशी साद देत ‘लोकमत’ने कोल्हापूरमध्ये दि. ६ जानेवारी रोजी महामॅरेथॉन आयोजित केली आहे. ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेच्या नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत आहे. स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून नावनोंदणीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत.

ठळक मुद्दे‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नोंदणीला वाढता प्रतिसादआता उरले अवघे दोन दिवस; काऊंटडाऊन सुरू

कोल्हापूर : ‘आरोग्यासाठी धावा’ अशी साद देत ‘लोकमत’ने कोल्हापूरमध्ये दि. ६ जानेवारी रोजी महामॅरेथॉन आयोजित केली आहे. ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेच्या नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत आहे. स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून नावनोंदणीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत.करवीरनगरीमध्ये होणाऱ्या महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वासाठी धडाक्यात नोंदणी सुरू आहे. यावर्षी महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन तीन किलोमीटर अंतराची राहणार आहे. ती सर्व वयोगटांसाठी खुली आहे.

लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे. विदेशातील स्पर्धकांनाही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली मेडल्स देण्यात येणार आहेत.

नाशिक आणि औरंगाबाद येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारी मेडल्स दिली आहेत. धावपटूने औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि पुणे, नागपूरमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळविल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा बनणार आहे.

या पाच शहरांमधील मॅरेथॉन जिंकून हे मेडल पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत गुरुवार (दि. २०)पर्यंत होती. मात्र, वाढता सहभाग लक्षात घेऊन लोकाग्रहास्तव सहभाग नोंदणीसाठी आणखी सहा दिवसांची वाढ केली आहे. बुधवारपर्यंत (दि.२६) नोंदणीसाठी अंतिम मुदत आहे.

नावनोंदणीसाठी संपर्कया महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे.

अबालवृद्ध धावणारकोल्हापूर शहर, जिल्ह्यातील मॅरेथॉनपटू, आयर्नमॅन, हौशी धावपटू, मास्टर्स अ‍ॅथलिट आणि सर्वसामान्य कोल्हापूरकर आपल्यासह कुटुंबाचाही सहभाग नोंदणी करीत आहेत. विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, संघटना, सामाजिक संघटना, क्रीडा संघटना, विविध प्रकारचे क्रीडा क्लब व उद्योगसमूहही आपल्या कर्मचाऱ्यांसह महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आबालवृद्ध या महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वात धावताना दिसणार आहेत.

सहा लाखाची बक्षीसेदुसऱ्या पर्वातील महामॅरेथॉनला नाशिक येथून सुरुवात झाली आहे. यात नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे महामॅरेथॉन उदंड प्रतिसादात पार पडली. आता कोल्हापुरात ६ जानेवारी रोजी तिसरी महामॅरेथॉन होणार आहे. त्यानंतर नागपूर येथे ३ फेबु्रवारी आणि १७ फेबु्रवारी २०१९ ला पुणे येथे महामॅरेथॉन होत आहे.

कोल्हापुरात होणारी ही महामॅरेथॉन २१ कि.मी. हाफ मॅरेथॉन , १० कि.मी. पॉवर रन, ५ किलोमीटर फन, तर ३ किलोमीटर फॅमिली रन होणार आहे. त्यातील विजेत्यांना पदक आणि सहा लाख रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathonलोकमत कोल्हापूर महामॅरेथॉनkolhapurकोल्हापूर