शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

कोल्हापूर : आरे केले, तर कारेने उत्तर देऊ : चंद्रदीप नरके, दडपण झुगारून सभेला या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 11:20 IST

सत्तारूढ गटाच्या नेत्यांची गर्वाची भाषा सुरू झाली असून, आरे केले तर कारेने उत्तर दिले जाईल, असा इशारा देत मल्टिस्टेटला विरोध केला म्हणून ‘गोकुळ’ने वासाचे दूध काढले, तर संचालकांच्या गाड्या आडवा, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.

ठळक मुद्देआरे केले, तर कारेने उत्तर देऊ : चंद्रदीप नरके, दडपण झुगारून सभेला यावासाचे दूध काढले तर संचालकांच्या गाड्या आडवा

कोल्हापूर : सत्तारूढ गटाच्या नेत्यांची गर्वाची भाषा सुरू झाली असून, आरे केले तर कारेने उत्तर दिले जाईल, असा इशारा देत मल्टिस्टेटला विरोध केला म्हणून ‘गोकुळ’ने वासाचे दूध काढले, तर संचालकांच्या गाड्या आडवा, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.मल्टिस्टेटबाबत गोकुळ बचाव कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार नरके म्हणाले, संकलन वाढवायच्या अगोदर विस्तारीकरण करणे हे बेकायदेशीर असून गेल्या निवडणुकीत ५०-६० मतांचा फरक राहिल्याने हेतुपुरस्सर मल्टिस्टेटचा विषय आणला आहे.

‘अमूल’ व ‘गोकुळ’च्या विश्वस्तांमध्ये जमीनअस्मानचा फरक आहे. साखर व्यवसायात आम्ही कितीही अडचणी आल्या तरी एफआपीप्रमाणे दर देतो, पण सरकारने गाय दूध २७ रुपयांनी खरेदी करण्याचा अध्यादेश काढूनही २३ ते २५ रुपयांनी खरेदी केली जाते. मग शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर आपण बाहेर पडू, असे म्हणणाऱ्यांना हा फरक दिसत नाही का? असा सवाल नरके यांनी केला.

साखर कारखान्यांचे संचालक शेतकऱ्यांच्या दडपणाखाली राहतात, पण ‘गोकुळ’चे उत्पादक संचालकांच्या दडपणाखाली असल्याचे चित्र आहे, हे दडपण झुगारून सभेला उपस्थित रहा, असे आवाहन नरके यांनी केले.संपतराव पवार म्हणाले, कष्टकऱ्यांच्या जिवावर ‘गोकुळ’ उभारले आहे, पण त्यांच्या घरात कोणी पाणी ओतण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते सहन करणार नाही. विरेंद्र मंडलिक, रणजितसिंह पाटील, प्रा. बाबासाहेब शिंदे, बाबासाहेब देवकर यांनी मनोगत व्यक्त केले.शिवाजी परूळेकर, अजित नरके, महेश नरसिंगराव पाटील, सदाशिव चरापले, अभिषेक बोंद्रे, उमेश आपटे, बाळासाहेब कुपेकर, कर्णसिंह गायकवाड, सत्यजित जाधव, दौलतराव जाधव, सचिन घोरपडे, आदी उपस्थित होते. प्रदीप पाटील यांनी आभार मानले.तर बापू आणि मी लढाई सुरूच ठेवूमहादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी काहीजण पुढाकार घेणार आहेत. हसन मुुश्रीफ यांनाही भेटायला येतील, तुम्ही जरी यातून माघार घेतली तरी संपतबापू आणि आपण लढाई सुरूच ठेवू, असे नरके यांनी सांगितले.

महाडिक मात्र तोफेलापी. एन. पाटील हे सतेज पाटील यांच्यावर बोलत नाहीत. ते हुशार आहेत, महादेवराव महाडिक यांना तोफेला देऊन आपण बाजूला राहतात, असा टोला नरके यांनी लगावला.

रविवारी सकाळी आठ वाजता यासभेदिवशी, रविवारी सकाळी आठ वाजता वॉटर पार्क येथे हजर राहायचे आणि नऊच्या आत सभा मंडपात उपस्थित राहण्याची सूचना सतेज पाटील यांनी सभासदांना केली. 

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर