शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोल्हापूर :  बघ्याची भूमिका घ्याल, तर कार्यालय उद्ध्वस्त करू, ‘स्वाभिमानी’चा सहसंचालकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 13:08 IST

जानेवारीला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार असाल, तर सहसंचालक कार्यालय जाग्यावर राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिला.

ठळक मुद्देबघ्याची भूमिका घ्याल, तर कार्यालय उद्ध्वस्त करू‘स्वाभिमानी’चा सहसंचालकांना इशारा एकरकमी एफआरपी डिसेंबरअखेर जमा करा

कोल्हापूर : यंदाचा हंगाम सुरू होऊन, ४५ दिवस संपले, तरी अद्याप शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळालेले नाहीत. डिसेंबरअखेर एकरकमी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाही, तर १ जानेवारीला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार असाल, तर सहसंचालक कार्यालय जाग्यावर राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिला.एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, यासाठी सोमवारी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांना निवेदन दिले. यावेळी अनिल मादनाईक यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली.

ऊस जाऊन दीड महिना झाला, तरी पैसे मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी करायचे काय? तुम्ही नुसते हातावर हात घालून बसणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. हे कार्यालय जाग्यावर राहणार नाही, हे ध्यानात ठेवावे. कारखान्याला ऊस घातल्याच्या पावत्या देतो, तुम्ही थेट फौजदारी दाखल करा, अशी मागणी मादनाईक यांनी लावून धरली.

मागणीचे निवेदन सहकार अधिकारी श्रेणी - १ रमेश बारडे व लेखापरीक्षक विजय पाटील यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जयकुमार कोले, वैभव कांबळे, भाऊ साखरपे, संभाजी नाईक, इकबाल कलावत, विजय भोसले, रमेश भोजकर, संपत पवार, अजित दानोळे, आण्णा मगदूम, आदी उपस्थित होते.सचिन रावल रजेवर जातात तरी कसे?ऊस दरावरून जिल्हा पेटला असताना, विभागाचे जबाबदार अधिकारी सचिन रावल हे रजेवर जातात तरी कसे? ते कामावर असतात तरी कधी, असा सवाल करत शेतकºयांचा पोरखेळ मांडला का? जबाबदारी अधिकारी चर्चेसाठी येत नाहीत तोपर्यंत येथून हालणार नाही, कार्यालयास कुलूप ठोकू, असा इशारा अनिल मादनाईक यांनी दिला.

म्हणून मांजर रात्रीचे शिकार करतेरात्रीचे उंदीर बाहेर पडतात म्हणून मांजर रात्रीचे शिकार करत नाही. वटवाघुळाप्रमाणे मांजराची बुबुळे रात्री उलटी होतात आणि त्याला अंधारातही दिसते, म्हणूनच ते रात्री शिकार करते. हे खरे कारण आहे, तुम्ही कारवाईबाबत चुकीची कारणे सांगू नका, असे आण्णासो चौगुले यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर