शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : उपेक्षितांची दिवाळी गोड करण्याचे आदर्श काम : अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 17:51 IST

कोल्हापुरात महाराष्ट्र  पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने समाजातील उपेक्षित लोकांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे व फराळाचे वाटप पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, संघटनेच्या हसिना शेख, जयश्री मगदूम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देउपेक्षितांची दिवाळी गोड करण्याचे आदर्श काम : अभिनव देशमुखनवीन कपडे, फराळाचे वाटप : महाराष्ट्र  पोलीस बॉईज संघटनेचा उपक्रम

कोल्हापूर : शहरातदेखील असे काही लोक आहेत की, त्यांना दोनवेळचे पोटभर अन्न मिळत नाही. अशा उपेक्षित लोकांची दिवाळी गोड करण्याचे आदर्श काम महाराष्ट्र  पोलीस बॉईज संघटना करीत आहे, असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी काढले.दिवाळीनिमित्त घरोघरी फराळाची मेजवानी असते. अशा वेळी आपल्या समाजातील एक वर्ग या आनंदापासून दूर आहे, हे सत्य किती भीषण अस्वस्थ करणारे आहे! वीटभट्टी, ऊसतोड कामगारांसह अनाथ, वंचित लोकांना दिवाळीची भेट म्हणून नवीन कपडे, साड्या व फराळाचे वाटप करण्याचा अनोखा कार्यक्रम महाराष्ट्र  पोलीस बॉईज संघटनेच्या राज्य पदाधिकारी हसिना शेख यांच्या सहकार्यातून गुरुवारी (दि. ८) पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता.

समाजातील सुमारे २०० महिला व पुरुषांना नवीन कपडे व फराळाचे वाटप पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून गोरगरीब, वंचित लोकांना अव्याहतपणे मदत करणे यापेक्षा मोठी दिवाळी नाही. वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, फिरस्ते अशा समाजातील वंचित लोकांना कपडे, फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे आदर्श काम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना करीत आहे.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, जिल्हा विशेष शाखेचे शशिराज पाटोळे, जनसंपर्क अधिकारी समीर गायकवाड, संघटनेच्या जिल्हाध्यक्षा जयश्री मगदूम, शामलाल बचराणी, नीलेश सुतार, सागर पाटील, पूनम यादव, फरजाना नदाफ, शोभा पाटील, लता पवार, संग्राम पाटील, रोहित नाळे, संग्राम खोत, पंकज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर