शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : हॉटेलचे बिल मागितल्याच्या रागातून दोघांना भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 18:31 IST

राजारामपुरी दुसरी गल्ली येथील हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यास चाकूने भोसकले. अजित भूपाल कांबळे (वय २३), सुनील मिलिंद कांबळे (२२, दोघे रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) अशी जखमींची नावे आहेत.

ठळक मुद्देहॉटेलचे बिल मागितल्याच्या रागातून दोघांना भोसकलेसराईत गुंड गौरव भालकरसह पाचजणांवर गुन्हा

कोल्हापूर : राजारामपुरी दुसरी गल्ली येथील हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यास चाकूने भोसकले. अजित भूपाल कांबळे (वय २३), सुनील मिलिंद कांबळे (२२, दोघे रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) अशी जखमींची नावे आहेत.

या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी सराईत गुंड गौरव भालकर (रा. २८, प्रतिभानगर), जया डंक, प्रशांत कांबळे (दोघे रा. शास्त्रीनगर), आकाश दाभाडे ऊर्फ मॅँव व त्याचे आणखी दोन साथीदार, आदींवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. १९) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.अधिक माहिती अशी, अजित कांबळे व सुनील कांबळे हे राजारामपुरी दुसरी गल्ली येथील हॉटेल मॅजिस्ट्रीकमध्ये नोकरीला आहेत. अजित हा व्यवस्थापक, तर सुनील वेटर आहे. गुरुवारी रात्री गौरव भालकर हा साथीदारांसोबत हॉटेलमध्ये आला. दारू, जेवण घेतल्यानंतर त्याचे बिल २७५० रुपये झाले.

व्यवस्थापक अजित कांबळे याने बिलाची मागणी केली असता एवढे कसे बिल झाले म्हणून त्यांनी त्याच्याशी वादावादी केली. यावेळी ‘बिल देत नाही जा,’ असे म्हणून त्याच्या डोक्यात चाकूने हल्ला केला.

सुनील वादावादी सोडविण्यास गेला असता त्याने त्याच्या पोटात चाकूने वार केले. दोघांवर खुनी हल्ला झाल्याने गोंधळ उडाला व संशयित पसार झाले. अन्य कर्मचाऱ्यांनी जखमी अवस्थेत दोघांनाही सीपीआर रुग्णालयात दाखल केले.भालकरचा नाटकी स्वभावखुनाचा प्रयत्न, घरात घुसून मारहाण, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या संशयित गौरव भालकर याने ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या’खाली (मोक्का) कारवाई टाळण्यासाठी राजारामपुरी पोलिसांच्या हातून निसटून फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

त्याच्यावर पोलीस दप्तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अटकेदरम्यान पोटदुखीचे निमित्त दाखवून तो रुग्णालयात दाखल होतो. तेथून बाहेर पडल्यानंतर पुन्हा दादागिरी, दहशत माजवीत असतो. नाटकी स्वभावापुढे तो पोलिसांना चकवा देत असतो. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर