शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 16:11 IST

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी निवृत्ती चौक येथील सावित्रीबाई फुले व्यासपीठावर शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महिलांचा व महानगरपालिकेतील महिला झाडू कामगारांचा पश्चिम महाराष्ट्र  देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महिलांचा सन्मानकेशव गोवेकर यांचा सत्कार

कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी निवृत्ती चौक येथील सावित्रीबाई फुले व्यासपीठावर शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महिलांचा व महानगरपालिकेतील महिला झाडू कामगारांचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.निवृत्ती चौक येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्यासपीठावर सावित्रीबार्इंच्या जयंतीचा कार्यक्रम सुरू करावा, अशी अपेक्षा नुकतेच दिगंवत झालेले ज्येष्ठ सिने दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार गतवर्षापासून या दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.गुरुवारी झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात कै. यशवंत भालकर यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर रौप्यमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या पोरे एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका मधुरा पोरे यांचा सत्कार महेश जाधव यांच्या हस्ते, रा. ना. सामाणी विद्यालयातील निवृत्त शिक्षिका आरती सिद्धनेर्लीकर यांचा भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या हस्ते, तर महानगरपालिकेच्या वि. स. खांडेकर प्रशालेतील सहायक शिक्षिका संगीता गिरी - गोसावी यांचा राहुल चिकोडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सावित्रीबार्इंची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या प्रभा टिपुगडे, प्रभा इनामदार, वैशाली पसारे, शशिकला मोरे, दीपा ठाणेकर, शारदा लोहार यांच्या हस्ते महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा साडी-चोळीची ओटी देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी पंचगंगा नागरी सहकारी बॅँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल केशव गोवेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभ कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक अजित ठाणेकर यांनी केले. सूत्रसंचालन हेमंत आराध्ये यांनी केले. यावेळी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेkolhapurकोल्हापूरBJPभाजपा