शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साखर उतारा ०.३९ टक्क्यांनी घटल्याचा परिणाम : पुढील हंगामातील कोल्हापूरची एफआरपीमध्ये ५० रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:07 IST

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १०, तर सांगलीतील एक कारखान्याचा हंगाम बंद झाला आहे. मार्चअखेर बहुतांश कारखान्यांची, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन कारखान्यांची धुराडी थंडावणार आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील अकरा ११ साखर कारखान्यांचे हंगाम बंद झाले असून, आतापर्यंत एक कोटी ६७ लाख टन गाळप झाले आहे. या महिन्याअखेर बहुतांश कारखाने, तर एक-दोन कारखाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ४६ लाख टनांनी हंगाम मागे असला तरी उर्वरित कालावधीत २०-२५लाख टन गाळप होऊ शकते.

गतवर्षीपेक्षा कोल्हापूर जिल्ह्याचा उतारा सध्या ०.२२ टक्क्यांनी कमी दिसत असल्याने पुढील हंगामातील ‘एफआरपी’मध्ये ५० रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी, महापूर आणि परतीच्या पावसाने झोडपल्याने साखर कारखान्यांच्या यंदाच्या हंगामासमोर उसाचे संकट होते. त्यामुळे मागील हंगामातील गाळपाच्या तुलनेत निम्म्यावर ऊस उत्पादन होईल, असा अंदाज होता. गाळप हंगामही उशिरा सुरू झाल्याने अद्याप कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १०, तर सांगलीतील एक कारखान्याचा हंगाम बंद झाला आहे. मार्चअखेर बहुतांश कारखान्यांची, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन कारखान्यांची धुराडी थंडावणार आहेत.

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात एक कोटी १० लाख २१ हजार ३५१, तर सांगली जिल्ह्यात ५७ लाख १९ हजार ५७८ असे विभागात एक कोटी ६७ लाख ४० हजार ९२९ टनांचे गाळप झाले. सरासरी १२.१५ टक्के साखर उतारा राखत दोन कोटी ३ लाख ४२ हजार ७६५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचे २४ लाख ३३ हजार ८२६ टनांनी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचे २२ लाख १६ हजार ४०२ टनांनी गाळप कमी झाले आहे. हंगाम संपायला अजून पंधरा-वीस दिवस आहेत. सध्या कारखान्यांचे गाळप पाहता दोन्ही जिल्ह्यांत अजून २० ते २५ लाख टन गाळप होण्याची शक्यता आहे. महापूर आणि अतिवृष्टीने उसाच्या उत्पादनाबरोबरच साखर उताऱ्याला मोठा फटका बसेल, असे वाटत होते. मात्र विभागाच्या सरासरी उताºयात ०.२२ टक्क्यांनी घट झाली आहे. 

सांगलीच्या ‘एफआरपी’वर परिणाम नाहीसांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप २४ लाख टनांनी कमी झाले असले तरी साखर उताºयात वाढच दिसत आहे. गेल्या हंगामात जिल्ह्याचा सरासरी उतारा १२.१३ टक्के होता, तो आता १२.१८ टक्के असून, शेवटच्या टप्प्यातील गाळपानंतर तो वाढण्याची शक्यता आहे. परिणामी सांगलीच्या एफआरपीवर कोणताही परिणाम होणार नाही. 

या कारखान्यांचा हंगाम संपलादौलत (अथर्व ट्रेडर्स), संताजी घोरपडे, भोगावती, आप्पासाहेब नलवडे, डी. वाय. पाटील, उदयसिंगराव गायकवाड (अथणी) , इंदिरा महिला (अथणी), रिलायबल फराळे, इको केन (म्हाळुंगे), कुंभी, मोहनराव शिंदे.

 

गतहंगामाच्या तुलनेत फार गाळप कमी होईल असे वाटत होते, तसे दिसत नाही. साखर उताराही जवळपास गतवर्षीएवढाच राहील, असा अंदाज आहे.- अरुण काकडे (प्रादेशिक साखर सहसंचालक) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने