कोल्हापुरात हिट अॅण्ड रन, भरधाव कारने 5 जणांना उडवलं

By Admin | Updated: September 29, 2016 08:04 IST2016-09-29T08:04:19+5:302016-09-29T08:04:19+5:30

दाभोळकर कॉर्नर ते न्यू शाहूपुरी रोड परिसरात भरधाव कारने पाच जणांना उडवलं असून अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे

In Kolhapur hit and run, 5 people were injured by car | कोल्हापुरात हिट अॅण्ड रन, भरधाव कारने 5 जणांना उडवलं

कोल्हापुरात हिट अॅण्ड रन, भरधाव कारने 5 जणांना उडवलं

>ऑनलाइन लोकमत 
कोल्हापूर, दि. 29 - शहरामध्ये रात्री हिट अॅण्ड रन घटना घडली आहे. भरधाव कारने पाच जणांना उडवलं आहे. या अपघातात एका महिलेचा जागीचा मृत्यू झाला असून इतर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. दाभोळकर कॉर्नर ते न्यू शाहूपुरी रोड या परिसरात ही घटना घडली. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र संतप्त लोकांनी गाडीची तोडफोड केली आहे.
 
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. चालकाने 5 दुचाकींना उडवलं ज्यांचा पुर्ण चक्काचूर झाला आहे.  शाहुपूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून गाडीच्या नोंदणीच्या आधारे चालकाचा शोध घेणार आहेत.
 

Web Title: In Kolhapur hit and run, 5 people were injured by car