शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

कोल्हापूर : आरोग्य विभागाने बदलला तिसऱ्या मजल्याचा ‘लुक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 14:15 IST

आरोग्य विभागामुळे जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्याचा ‘लुक’ बदलला आहे. विविध योजनांचे लावण्यात आलेले फलक, त्यांवर आकर्षक प्रकाशझोत आणि तयार करण्यात आलेल्या माहिती कक्षामुळे हा मजला लक्षवेधी ठरला आहे. लवकरच या प्रकल्पाचे रीतसर उद्घाटन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाने बदलला तिसऱ्या मजल्याचा ‘लुक’माहिती कक्ष, फलकांद्वारे योजनांचे जनजागरण

कोल्हापूर : आरोग्य विभागामुळे जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्याचा ‘लुक’ बदलला आहे. विविध योजनांचे लावण्यात आलेले फलक, त्यांवर आकर्षक प्रकाशझोत आणि तयार करण्यात आलेल्या माहिती कक्षामुळे हा मजला लक्षवेधी ठरला आहे. लवकरच या प्रकल्पाचे रीतसर उद्घाटन करण्यात येणार आहे.गरोदर महिलेपासून ते अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांपर्यंत अनेकांना लाभ देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दुसऱ्या मजल्यावर कार्यरत आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागाने शासकीय योजनांचे फलकही आकर्षक पद्धतीने लावले आहेत.या मजल्यावर गेल्यानंतर समोरच नागरिकांना दृष्टीस पडेल असा एक आकर्षक कक्ष तयार करण्यात आला आहे. स्तनपानाचे महत्त्व, १०८ रुग्णवाहिका, डॉक्टरांचा सल्ला, पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष यांबाबत मार्गदर्शन करणारे फलक आणि संदेश देणाऱ्या महिला, बाळांचे कटआउट्स या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. तसेच येथे आता विविध संदेश फलकही लावण्यात येणार आहे. रंगीत कटआउट्समुळे हा कक्ष अधिकच आकर्षक झाला आहे.या मजल्यावरील पॅसेजमध्येही आरोग्य विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देणारे फलक लावण्यात आलेले आहेत. यावर आकर्षक असे प्रकाशझोत टाकण्यात आले आहेत. अशा प्रभावी पद्धतीने आरोग्य विभागाने संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील,आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळी, डॉ. उषादेवी कुंभार, विस्तार अधिकारी एकनाथ जोशी यांनी ही संकल्पना राबविली. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर