शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, हातकणंगलेत प्रचार शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:57 IST

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होत असून, रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. ...

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होत असून, रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. अखेरच्या दिवशी गाठीभेटी, प्रचार रॅली, पदयात्रा व सभांचा मेळ घालताना उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसले. जाहीर प्रचार थांबला असला तरी अंतर्गत जोडण्या मात्र वेगावल्या आहेत. दोन्ही मतदारसंघांत बहुरंगी लढत होत असली तरी खरा सामना राष्टÑवादी आघाडी व शिवसेनेतच होत आहे. जिल्हा प्रशासनाने मतदान यंत्रणा सज्ज ठेवली आहे.लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीतीलराष्टÑवादी आघाडीचे धनंजय महाडिक व शिवसेना-भाजप युतीचे संजय मंडलिक या मल्लांतच या वेळेला सरळ लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अरुणा माळी यांनीही प्रचारयंत्रणा नेटाने राबविली आहे. हातकणंगलेमध्ये आघाडीचे राजू शेट्टी व युतीचे धैर्यशील माने यांच्यात काट्याची टक्कर पाहावयास मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद यांनीही हवा केली आहे.लोकसभेची निवडणूक असल्याने भाजप-शिवसेना सरकारच्या कारभारावर टीकाटिप्पणी झाली; पण उमेदवारांचा खरा प्रचार व्यक्तिगत टीकेवरच राहिला. स्थानिक निवडणुकीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप झाले. कोल्हापूर मतदारसंघात ‘गोकुळ’ हाच शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला; तर हातकणंगलेमध्ये गेल्या दहा वर्षांतील विकास आणि शेतकरी संघटनेची आंदोलने प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिली.निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी सहा वाजता संपला. प्रचार रॅली, पदयात्रा, गाठीभेटी, बैठका, सभांचा धडाका शेवटच्या टप्प्यात राहिला. शेवटचे आठ-दहा तास मिळणार असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची प्रचार यंत्रणा राबविताना दमछाक उडाली. जाहीर प्रचार संपला असला तरी छुप्या जोडण्या वेगावल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात फोडाफोडीसह इतर आमिषे दाखविली जात आहेत.--------------मतदान केंद्र व मतदार संख्या : कोल्हापूरविधानसभा मतदारसंघ केंद्रे मतदारचंदगड ३७६ ३,१९,१४३राधानगरी ४२३ ३,२६,३०८कागल ३५१ ३,२१,२८४कोल्हापूर दक्षिण ३२२ ३,२२,१८०करवीर ३५१ ३,०२,०३२कोल्हापूर उत्तर ३०९ २,८३,३९८————————————————————-एकूण २१३२ १८,७४,३४५——————————————————————————-मतदान केंद्र व मतदार संख्या : हातकणंगलेविधानसभा मतदारसंघ केंद्रे मतदारशाहूवाडी ३३२ २,८७,२९८हातकणंगले ३३० ३,१९,७१६इचलकरंजी २६७ २,९२,९८०शिरोळ ३०१ ३,१२,४९५शिराळा ३३४ २,६९,२९५इस्लामपूर २९२ २,९०,७७९———————————————————————एकूण १८५६ १७,७२,५६३——————————————————————यांची लागली प्रतिष्ठा पणास -कोल्हापूर मतदारसंघराष्ट्रवादी आघाडी : धनंजय महाडिक, महादेवराव महाडिक, हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, संध्यादेवी कुपेकर, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, बजरंग देसाई, भरमूअण्णा पाटील, अरुण नरके, आर. के. पोवार.शिवसेना युती : संजय मंडलिक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, संजय पवार, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, विजय देवणे, संजय घाटगे, संग्राम कुपेकर, राजेश पाटील, दिनकरराव जाधव.हातकणंगले मतदारसंघस्वाभिमानी आघाडी : राजू शेट्टी, जयंत पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, विनय कोरे, मानसिंगराव गायकवाड, मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील.शिवसेना युती : धैर्यशील माने, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील, शिवाजीराव नाईक, उल्हास पाटील, माधवराव घाटगे.