कोल्हापूर : शाहू विद्यालयाची हॅट्ट्रिक

By Admin | Updated: September 23, 2014 00:46 IST2014-09-23T00:39:33+5:302014-09-23T00:46:37+5:30

१७ वर्षांखालील शालेयस्तर बास्केटबॉल स्पर्धा

Kolhapur: Haftrik of Shahu Vidyalaya | कोल्हापूर : शाहू विद्यालयाची हॅट्ट्रिक

कोल्हापूर : शाहू विद्यालयाची हॅट्ट्रिक

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘मनपा’स्तर १७ वर्षांखालील बास्केटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात छत्रपती शाहू विद्यालयाने शांतिनिकेतनवर मात करीत विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली.
पोलीस परेड मैदान येथे अंतिम सामना छत्रपती शाहू विद्यालय विरुद्ध शांतिनिकेतनमध्ये झाला. यावेळी छत्रपती शाहू विद्यालयाने हा सामना २६ विरुद्ध २१ गुणांनी जिंकत सलग तिसऱ्या वर्षी अजिंक्यपद मिळवून हॅट्ट्रिक साधली.
विजयात राक्षी गायकवाड, रिया भणगे, तन्वी मंत्री (कर्णधार) यांनी मोलाची कामगिरी केली. तसेच मैत्रयी गुप्ते, आर्या हणमर, श्रवरी पाठक, युक्ता पाटील, सिद्धी देशिंगे, ऋचा सरदेसाई, संयोगिता शिंदे यांनीही संघांच्या विजयासाठी मोलाची साथ दिली.

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या १७ वर्षांखालील बास्केटबॉल स्पर्धेतील विजेता छत्रपती शाहू विद्यालयाचा मुलींचा संघ. सोबत प्राचार्या राजश्री पाटील.

Web Title: Kolhapur: Haftrik of Shahu Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.