शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पालकमंत्र्यांची हुकमशाही, दडपशाही, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 11:50 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची हुकमशाही, दडपशाही सुरू असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केला. पोलिस प्रशासनाकडून ओळखपत्र पाहून नगरसेवकांना महानगरपालिकेत सोडण्यावरून पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्याशी झालेल्या वादावादीवेळी त्यांनी हा आरोप केला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची हुकमशाही, दडपशाही, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांचा आरोपनोकरी करतो, राजकारण नाही : सूरज गुरव

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची हुकमशाही, दडपशाही सुरू असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केला. पोलिस प्रशासनाकडून ओळखपत्र पाहून नगरसेवकांना महानगरपालिकेत सोडण्यावरून पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्याशी झालेल्या वादावादीवेळी त्यांनी हा आरोप केला.महापौर निवडीसाठी ओळखपत्र पाहून नगरसेवकांना महानगरपालिकेत पोलिसांकडून सोडण्यात येत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक आत जाताना त्यांच्याकडून पोलिसांनी ओळखपत्राची मागणी केली. त्यावर आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी ओळखपत्र तपासणीचे काम महानगरपालिका प्रशासनाचे आहे.पोलिसांचे नाही असे सांगत त्यावर आक्षेप घेतला. त्याठिकाणी असलेल्या पोलिस उपअधिक्षक सूरज गुरव यांनी सुरक्षेच्या कारणावरून ओळखपत्राची तपासणी केली जात आहे.

सर्व नगरसेवकांच्या ओळखपत्राची तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले. त्यावरून आमदार मुश्रीफ, आमदार पाटील आणि पोलिस उपअधीक्षक गुरव यांच्या जोरदार वादावादी सुरू झाली.

पोलिस उपअधीक्षक गुरव यांनी आम्ही नोकरी करतो, राजकारण करत नाही. हवं तर गडचिरोलीला जातो, पण वाटेल ते बोलू नका असे प्रतिउत्तर दिले. या दरम्यान, अन्य पोलिस कर्मचारी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद थांबविला. या वादावादीमुळे याठिकाणी काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरkolhapurकोल्हापूरHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील