शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन, व्याख्यान, मिरवणूक-सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 14:05 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना व पक्षांच्या वतीने उद्या, रविवारी व्याख्यान, प्रबोधनपर मिरवणूक अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्दे‘फुले-शाहू-आंबेडकर फोरम’तर्फे मनीषानगर येथे सकाळी दहा वाजता शोभा रोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कोल्हापूरशी ऋणानुबंध’ या विषयावर व्याख्यान

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना व पक्षांच्या वतीने उद्या, रविवारी व्याख्यान, प्रबोधनपर मिरवणूक अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सिद्धार्थनगर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी ध्वजारोहण, बाबासाहेबांच्या पुष्पहार अर्पण, बुद्धवंदना आणि विविध क्षेत्रांतील खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कोल्हापूरशी ऋणानुबंध’ या विषयावर व्याख्यान होईल.

दुपारी चार वाजता माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होईल. यात बारा बलुतेदारांचा सहभाग असणार आहे. तसेच बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ, महाड येथील चवदार तळे, शाहूभक्त गंगाराम कांबळे यांचे हॉटेल, तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेबांचा संविधानाचा पेन, संविधानाचे महत्त्व दर्शविणारा फिरता देखावा, पारंपरिक वाद्यवृंद व भव्य लेसर शो असणार आहे.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनात प्रा. गोपाळ गुरू यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक आधुनिक कैवारी’ या विषयावर ते विवेचन करणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य दिनकर खाबडे असतील. ‘फुले-शाहू-आंबेडकर फोरम’तर्फे मनीषानगर येथे सकाळी दहा वाजता शोभा रोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

त्यानंतर डॉ. प्रकाश पवार यांचे ‘डॉ. आंबेडकरप्रणित भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर तर डॉ. रवींद्र ठाकूर यांचे ‘जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान होईल.सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र, श्री शिवाजी मराठा फौंडेशन व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानतर्फे सकाळी अकरा वाजता तुपाची विहीर, पावनगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कोल्हापूर शहर मध्यवर्ती समितीच्या वतीने सकाळी ११ वाजता बिंदू चौकात जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तसेच १२८ व्या जयंतीनिमित्ताने १२८ लोकांना संविधान पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार आहे.चोवीस तास ‘ड्राय डे’ पाळण्यात यावाबाबासाहेबांचा जयंती दिवस हा २४ तास ड्राय डे करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, या मागणीचे निवेदन आम्रपाली महिला विचार मंचच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांना देण्यात आले. या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेतच ‘ड्राय डे’ असल्याने अनेकजण मद्यपान करून उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे या दिवशी चोवीस तास ड्राय डे पाळला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपाध्यक्षा पूनम बानकर, सुप्रभा चोपडे, प्रिया सरनाईक यांच्यासह महिला उपस्थित होत्या. 

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीkolhapurकोल्हापूर