शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोल्हापूर : पानसरे, दाभोलकर यांच्या मारेकऱ्याना सरकार पाठीशी घालतंय : उमा पानसरे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:35 IST

परिवर्तनवादी विचारांनी काम करणाऱ्या अ‍ॅड. गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्याना सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप उमा पानसरे यांनी शुक्रवारी येथे केला. विचारवंतांच्या हत्यांच्या तपासात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; यासह शेतकऱ्याना दीडपट हमीभाव द्यावा, कर्जमाफी करावी, विनाअट पेन्शन मिळावी, आदी विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकार खाली खेचण्याचे आवाहन करण्यात आले.

ठळक मुद्देपानसरे, दाभोलकर यांच्या  मारेकऱ्याना सरकार पाठीशी घालतंय उमा पानसरे यांचा आरोप मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी : ‘भाकप’तर्फे धडक मोर्चा

कोल्हापूर : परिवर्तनवादी विचारांनी काम करणाऱ्या अ‍ॅड. गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्याना सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप उमा पानसरे यांनी शुक्रवारी येथे केला. विचारवंतांच्या हत्यांच्या तपासात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; यासह शेतकऱ्याना दीडपट हमीभाव द्यावा, कर्जमाफी करावी, विनाअट पेन्शन मिळावी, आदी विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकार खाली खेचण्याचे आवाहन करण्यात आले.टाउन हॉल उद्यान येथून दुपारी साडेबाराच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये रणरणत्या उन्हातही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील भाकपचे कार्यकर्ते हातात लाल झेंडे आणि सरकारविरोधातील फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. मोर्चा शिवाजी चौक, बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी त्याचे रूपांतर सभेत झाले.यावेळी उमा पानसरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. हे सरकार पानसरे, दाभोलकर या विचारवंतांच्या मारेकऱ्याना पाठीशी घालत आहे, असे सांगून हत्यांच्या तपासामध्ये लक्ष न घालणाऱ्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही; कारण हे भाजप सरकार भ्रष्ट असून त्यांना बुद्धिवादी व विचारवंत लोकच नको आहेत. त्यांना योगी व भ्रष्टाचारीच लोक पाहिजेत. त्यामुळे हे सरकार घालविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून, त्याला यश येईल, असे उमा पानसरे यांनी सांगितले.दरम्यान, उमा पानसरे, नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, लता भिसे, प्रवीण मस्तूद, रमेश सहस्रबुद्धे, शाम चिंचणे, आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यामध्ये गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, कलबुर्गी अशा विचारवंतांच्या मारेकऱ्याना सूत्रधारासह पकडून शिक्षा करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.

वाढती महागाई, शिक्षणाचे खासगीकरण व धार्मिकीकरण रद्द करून १३१४ शाळा बंदचा निर्णय मागे घ्यावा, शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा, कामगारांना किमान समान वेतन, महिला, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्यावरील वाढते अत्याचार थांबवावेत, आरामबस व बसचालकांना बेकायदेशीरपणे अडवून संविधानाची व न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.आंदोलनात दत्ता मोरे, रघुनाथ कांबळे, गिरीश फोंडे, बी. एल. बरगे, दिनकर सूर्यवंशी, स्वाती क्षीरसागर, शिवाजी माळी, प्रशांत आंबी, दिलदार मुजावर, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर