शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गुंड योगेश राणेसह आठजणांना ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 18:24 IST

खंडणीच्या गुन्ह्यात अटक केल्याचा राग मनात धरून पोलिसांना धमकाविणाऱ्या गुंड योगेश राणे याच्यासह आठ साथीदारांना शनिवारी ‘मोक्का’ लावण्यात आला.

ठळक मुद्देगुंड योगेश राणेसह आठजणांना ‘मोक्का’कारवाईसाठी प्रस्तावस शनिवारीच मंजुरी

कोल्हापूर : खंडणीच्या गुन्ह्यात अटक केल्याचा राग मनात धरून पोलिसांना धमकाविणाऱ्या गुंड योगेश राणे याच्यासह आठ साथीदारांना शनिवारी ‘मोक्का’ लावण्यात आला.

या टोळीच्या विरोधात खुनी हल्ला, खंडणी, फसवणूक, मारहाण, आदी गंभीर गुन्हे कोल्हापूरसह कऱ्हाड येथे दाखल आहेत. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी दोन टोळ्यांना ‘मोक्का’ लावण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.संशयित टोळीप्रमुख योगेश बाळासो राणे (वय ३४, रा. ई वॉर्ड, शाहूपुरी पाचवी गल्ली), आकाश आनंदा आगलावे (२५, रा. न्हाव्याचीवाडी-शिळोली, ता. भुदरगड), मारुती मधुकर कांबळे (२९, रा. निगवे खालसा, ता. करवीर), हृषिकेश राजेंद्र फुटाणकर (३१, रा. मालवे कॉलनी, सरवडे, ता. राधानगरी), विशाल बाजीराव पाटील (३१, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर), शेखर दत्तात्रय कुलकुटकी (२०, रा. शाहूनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.

या सर्वांना अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये कारागृहात आहेत. सुशांत बाळासाहेब देसाई (रा. सोनाळी, ता. भुदरगड), प्रसाद सुरेश घाटगे (रा. शाहूनगर, कोल्हापूर) हे दोघे पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी कमिशन एजंट विजय निवृत्ती कांबळे (३८, रा. निगवे खालसा, ता. करवीर) यांचे अपहरण व मारहाण करून त्यांच्याकडून ७८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी गुंड योगेश राणेसह त्याच्या साथीदारांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती.

त्याच्यावर शाहूपुरी, जुना राजवाडा, हातकणंगले, भुदरगड, कऱ्हाड (जि. सातारा), आदी ठिकाणी हत्यार तस्करी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, फसवणूक, जुगार असे तेरा गुन्हे दाखल आहेत. त्याची टोळी शहरासह उपनगरांत कार्यरत आहे. त्याने चौकशीदरम्यान पोलिसांना ‘बघून घेतो,’ अशी धमकी दिली होती.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांनी संशयित राणे टोळीच्या विरोधात ‘मोक्का’ कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यास शनिवारीच मंजुरी दिल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर