शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दुचाकीच्या डिक्कीतून १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:57 IST

रुईकर कॉलनी जनता बझारजवळ लॉक करुन असलेल्या दुचाकीच्या डिक्कीमधील १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने , धनादेश, बँकेची दोन पासबुके असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी उघडकीस आली. याबाबत कलाथरन कुमार मेनन यांनी शाहूपुरी पोलिसात रात्री फिर्याद दिली.

ठळक मुद्देदुचाकीच्या डिक्कीतून १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने गायबरुईकर कॉलनीतील घटना : साडेतीन लाखाचा मुद्देमाल चोरीस

कोल्हापूर : रुईकर कॉलनी जनता बझारजवळ लॉक करुन असलेल्या दुचाकीच्या डिक्कीमधील १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने , धनादेश, बँकेची दोन पासबुके असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी उघडकीस आली. याबाबत कलाथरन कुमार मेनन यांनी शाहूपुरी पोलिसात रात्री फिर्याद दिली.पोलिसांनी सांगितले की, कलाथरन मेनन ह महाडिक वसाहत येथे पत्नीसह राहण्यास आहेत तर मुलगा कैलासनाथ मेनन हा नोकरीनिमित्त त्याच्या पत्नी, मुलासह अहमदाबाद येथे एकत्रित राहतो. कलाथरन यांचा धाकटा भाऊ श्रीनारायणन मेनन यांची मुलगी अंजली यांचे असलेले सोन्याचे दागिने काढण्यासाठी विजयाकुमार मेनन या  दुचाकीवरुन लक्ष्मीपुरी येथील एका बँकेत गेल्या.

बँकेतील लॉकरमधील दागिने काढून त्या तेथून राजारामपुरी येथील दुसऱ्या एका बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या. पण; ही बँक बंद असल्याने त्या रुईकर कॉलनी जनता बझार येथे भाजी खरेदीसाठी व किराणा माल  दुकानात गेल्या. त्यांनी गणेश ट्रेडर्स दूकानासमोर  दुचाकी लॉक केली.

थोड्यावेळाने किराणा सामान व भाजी खरेदी करुन त्या  दुचाकीजवळ आल्या. त्यांनी डिक्की उघडली तर डिक्कीतील पिशवीमधील पालका नेकलेस, रुबी नेकलेस, लक्ष्मी हार व लॉकेट असे सोन्याचे दागिने आणि धनादेश, बँकेची दोन पासबुके असा सुमारे तीन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरट्याने बनावट चावीने किंवा डिक्की उचकटून चोरी केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.गुरुवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली.

दिवसाढवळ्या घटना ; पोलिस अपयशीशाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या रोज घरफोडी, दुचाकी चोरी घटना घडत आहेत. सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.पोलिस हद्दीत गस्त घालतात की नाही, अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर