शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सोने अपहार प्रकरण : सराफ सन्मुख ढेरेला कोठडी, २६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:42 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावटगिरीतील फरार झालेल्या संशयित सराफाला पोलिसांनी अटक केली होती. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देकोल्हापूर : सोने अपहार प्रकरण : सराफ सन्मुख ढेरेला कोठडी २६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावटगिरीतील फरार झालेल्या संशयित सराफाला पोलिसांनी अटक केली होती. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

संशयित सराफ सन्मुख आनंदराव ढेरे (वय ३५, रा. पिंजार गल्ली, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. संशयितांच्या ताब्यातून सोने किंवा पैसे हस्तगत झालेले नाही. सराफ ढेरे याच्या चौकशीमधून अपहार प्रकारणाचे गुढ बाहेर येणार आहे.सोने तारण कर्ज प्रकरणात शाखाधिकारी संंभाजी पाटील, कॅशिअर परशराम नाईक व सराफ सन्मुख ढेरे या तिघांनी संगनमताने २७ प्रकरणांत सुमारे १०० तोळ्यांचे बनावट सोने तारण ठेवून सुमारे ३२ लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

या तिघांनी सोन्याचे दागिन्यांची विल्हेवाट कुठे लावली, त्यातून मिळालेल्या पैसे कुठे गुंतवले याची माहिती अद्यापही पोलीसांच्या हाती लागलेली नाही. सराफ ढेरे हा तपासाच्या दूष्ठीने महत्वाचा होता. तो हाती लागल्याने अपहार प्रकरणातील गुढ बाहेर येणार आहे.

या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा हात असण्याची शक्यता आहे, त्या दूष्ठीनेही पोलीस तपास करीत आहेत. आतापर्यंत २६ साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत. बँकेतील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही जबाब घेतले आहेत. तिघेही संशयित तपासामध्ये पोलीसांना सहकार्य करीत नाहीत.

खाकीचा प्रसाद देवून त्यांना बोलते करण्याची तयारी पोलीसांनी केली आहे. या अपहार प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्याचे तपासाकडे लक्ष लागुन राहिले आहे. याप्रकरणी अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत करीत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हाGoldसोनं