शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तालुका दूध संघप्रकरणी ‘गोकुळ’चाच ‘यू’ टर्न : उच्च न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 01:02 IST

राज्य शासनाचे तालुका दूध संघांना सरसकट परवानगी देण्याचे धोरण असताना, त्यास विरोध म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघा (गोकुळ) ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि तोच संघ आता ‘मल्टिस्टेट’चा ठराव करून तालुका संघांची दारे

ठळक मुद्देपरवानगी देण्याचे सरकारचेही म्हणणेया दाव्यात राज्य सरकारनेही तालुका संघांना परवानगी देण्यास हरकत नसल्याचे

विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्य शासनाचे तालुका दूध संघांना सरसकट परवानगी देण्याचे धोरण असताना, त्यास विरोध म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघा (गोकुळ) ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि तोच संघ आता ‘मल्टिस्टेट’चा ठराव करून तालुका संघांची दारे खुली करायला निघाला असल्याचे चित्र आहे.

या दाव्यात राज्य सरकारनेही तालुका संघांना परवानगी देण्यास हरकत नसल्याचे म्हणणे दिले आहे. न्यायाधिश तातेड व न्यायाधीश शिंदे यांच्यासमोर ही याचिका असून त्याची सुनावणी २२ सप्टेंबरपर्यंतच्या आठवड्यात (सिरियल नंबर २०५) नियोजित आहे.

२००५ च्या सुमारास राज्यात तालुका संघांना परवानगी देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले. असे तालुका संघ झाले तर अनिष्ट स्पर्धा वाढेल व सगळेच संघ आजारी पडून चांगले जिल्हा संघही बंद पडतील, अशी भीती वाटल्याने कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्हा दूध संघांनी उच्च न्यायालयात याचिका (क्रमांक ७८६३/२००५) दाखल केली. या याचिकेमध्ये गोकुळ कर्मचारी संघटनाही पक्षकार आहे.

बारामती तालुका संघास परवानगी देण्यास विरोध म्हणून ही याचिका करण्यात आली; परंतु काँग्रेस आघाडी सरकारने त्यावेळी दूध संघांचा विरोध लक्षात घेऊन न्यायालयात आपले म्हणणेच दिले नव्हते; तथापि आता ही याचिका बोर्डावर आली असून तिच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने तालुका दूध संघांना परवानगी देण्यास हरकत नसल्याचे म्हणणे दिले आहे. त्यामुळे आता तालुका संघ सुरू करण्यास बंधन राहणार नाही.

जिल्हास्तरीय दूध संघांवर दोन्ही काँग्रेसचा कब्जा आहे. साखर कारखानदारीप्रमाणेच दूध संघही या पक्षांची मक्तेदारी बनली असल्याने त्याद्वारे ग्रामीण राजकारण मुठीत ठेवण्याचा प्रयत्न आजपर्यंत या पक्षांकडून झाला आहे. या संस्था स्वबळावर जिंकणे भाजपला शक्य नसल्याने, पर्यायी संस्था उभारण्यास पाठबळ हे भाजपचे धोरणच असल्याने त्यांनी तालुका दूध संघांना परवानगी देण्याची भूमिका घेतली आहे.मालकानेच घेतली माघारज्यांनी या निर्णयाला न्यायालयात याचिका दाखल करून विरोध केला, तोच गोकुळ दूध संघ आता ‘मल्टिस्टेट’चा ठराव करीत आहे. त्यामुळे मूळ मालकानेच माघार घेतल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत तुमच्या या निर्णयाने आमच्या हितसंबंधांना काय धोका पोहोचेल का, अशी विचारणा करणारे पत्र कर्मचारी संघटनेने संचालक मंडळास दिले आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाkolhapurकोल्हापूर