शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर : थर्टी फर्स्टसाठी आणलेले साडेसहा लाखाचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 17:04 IST

गोवा बनावटीचे विदेशी मद्यजवळ बाळगल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाने पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून साडेसहा लाखाचे विदेशी मद्य, पाच दूचाकी असा सुमारे आठ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सावित्रीबाई फुले रुग्णालय परिसर व सानेगुरुजी वसाहत येथे एका घरावर करण्यात आली.

ठळक मुद्देसाडेसहा लाखाचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त, पाच जणांना अटकसावित्रीबाई फुले रुग्णालय परिसर,सानेगुरुजी वसाहतीत घरात ‘राज्य उत्पादन’चा छापा

कोल्हापूर : गोवा बनावटीचे विदेशी मद्यजवळ बाळगल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाने पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून साडेसहा लाखाचे विदेशी मद्य, पाच दूचाकी असा सुमारे आठ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सावित्रीबाई फुले रुग्णालय परिसर व सानेगुरुजी वसाहत येथे एका घरावर करण्यात आली.संशयित कुलदीप शरद पाटील (वय ३८, रा. शाहूपूरी ई वॉर्ड, कोल्हापूर) , संग्राम पांडूरंग पाटील (२४, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा) व महेश संजय पाटील (२९, रा. जयहिंद स्पोर्टस चौक, क सबा बावडा, कोल्हापूर), सईद अब्दुल्ला गडावाले उर्फ पिंटू, व नागेश दीपक भोसले (पत्ता समजू शकला नाही) अशी पाच जणांची नांवे आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सावित्रीबाई फुले रुग्णालयासमोर विनापरवाना गोवा बनावट विदेशी मद्याची देवाण-घेवाण करणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकातील जवान साध्या वेशात थांबले. यावेळी एक जण दूचाकीच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रवासी बँगा अडकवून याठिकाणी आला.

दूचाकीवरील बँगा खाली उतरुन तो तेथे थांबला. थोड्यावेळाने दोन अज्ञात वेगवेगळ्या दूचाकीवरुन त्याच्याजवळ आले. त्या दोघांना एक-एक बॅग देत असताना जवानांनी या अशा एकूण तिघांना रंगेहाथ पकडले. या बॅगेमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या मिळून आल्या.या विदेशी मद्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सानेगुरुजी वसाहत , देशमुख हायस्कुलच्या पिछाडिस ‘पिंटू ’या व्यक्तिने आपणाला घरातून दिले असल्याचे सांगितले. या तिघांना घेऊन पोलिसांनी त्या घरावर छापा टाकला. या घरासमोर लावण्यात आलेल्या दोन दूचाकीतील कापडी पिशवीत कागदी पुड्याचा बॉक्स होता, त्यामध्ये दोन तर घरामध्ये ७५० मिलिचे मद्याच्या बाटल्या मिळून आल्या.

याप्रकरणी संशयित सईद अब्दुल्ला गडवाले उर्फ पिंटू व नागेश भोसले या दोघांनी हा साठा आपला मालकीचा असल्याची कबुली दिली.या दोघांनी हे घर भाड्याने घेतले होते.याची कल्पना घरमालकांना दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.

या गुन्हया प्रकरणी पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डसचे ७९ कागदी बॉक्स ,पाच दूचाकी असा मुद्देमाल जप्त केला. हे मद्य स्वस्तात गोवा राज्यातून खरेदी करुन आणले होते. ते नववर्षारंभ करिता वितरित करण्यासाठी आणले असल्याचे या संशयितांनी सांगितले.ही कारवाई जिल्हा अधीक्षक गणेश पाटील व उपअधीक्षक बापुसो चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, के.बी.नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे यांनी केली. तपास बरगे करीत आहेत. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूर